Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

अमित कदम यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार

अमित कदम यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार


खासदार नारायण राणे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे अमित कदम यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी

कणकवली: आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्वर आणि ब्रॉन्झ पदक पटकावणारे कोकणी बॉडीबिल्डर अमित अनिल कदम याचा आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज ओम गणेश बंगल्यावर सत्कार करण्यात आला.
देशासाठी आणि संपूर्ण जिल्हावासियांची मान अंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात अभिमानाने उंचवणाऱ्या हरकुळ येथील अमित कदम यांच्या या यशा नंतर चाहते, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच देशवासियांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. अनेकांनी तिरंगा हातात घेऊन अमित कदम यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा आनंद साजरा केला.

अनेक वर्षांची मेहनत, कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली आणि जिद्दीच्या जोरावर अमित कदम यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या यशामुळे कोकणातील आणि महाराष्ट्रातील तरुणांना मोठी प्रेरणा मिळाली आहे.
अमित कदम यांनी सांगितले की,“हे यश माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या देशवासियांचे प्रेम, कुटुंबाचे आशीर्वाद आणि सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी हे यश मिळवू शकलो. हे पदक मी भारताला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करतो.”
दरम्यान आज कणकवलीतील ओम गणेश बंगल्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतल्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अमित कदम याचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी फोंडा घाट येथील बबन हळदीवे, माजी सभापती सुजाता हळदीवे, विश्वनाथ जाधव,हेमंत फोंडेकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणाचा आणि भारताचा गौरव वाढवणाऱ्या अमित कदम यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ruchira top