Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आमदार निलेश राणे यांची ठाम मागणी ; आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर !

आमदार निलेश राणे यांची ठाम मागणी ; आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर !


आंबा काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत पावसाळी अधिवेशनात मांडली आक्रमक व ठाम भुमिका

१२ तासांच्या आत नुकसान भरपाई जाहीर


मालवण | प्रतिनिधी :
कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे सभागृहात सरकारकडे आग्रही मागणी करत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा शब्द सभागृहात दिला होता. त्यानुसार कार्यवाही करत १२ तासांच्या आत शासन निर्णय जाहीर करत प्रती हेक्टरी २२,५०० प्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे. यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांना एकूण ७९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे, यात कुडाळ तालुक्यातील ७ हजार ७५१ शेतकऱ्यांना १२ कोटी ५७ लाख तर मालवण तालुक्यातील ७ हजार ४२९ शेतकऱ्यांना ११ कोटी २२ लक्ष एवढी नुकसानभरपाई मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त विमा कंपन्यांनाकडून नुकसानभरपाई मिळणे बाकी असून आमदार निलेश राणे यांचा त्याबाबतही पाठपुरावा सुरु आहे.

कोकणातील बागायतदार, शेतकऱ्यांची समस्या आक्रमक व बेधडक शैलीत मांडली. अवघ्या काही तासात शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली. आमदार निलेश राणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. २०१३ नंतरची अश्या प्रकारची ही पहिलीच नुकसानभरपाई आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली असून खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा व प्रयत्न यशस्वी ठरले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

मार्च एप्रिल मे २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून ३३४ कोटी ९८ लक्ष रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यात कोकण विभागातील आंबा आणि काजू नुकसानीसाठी २०९ कोटी १० लक्ष रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. आंबा काजू बागायतदारांना अश्या पद्धतीची नुकसानभरपाई ही 2006 व 2013 साली मिळाली होती त्यानंतरची ही पहिली मदत आहे. अशी माहिती प्राप्त झाली आहे.

ruchira top