महा ई सेवा केंद्र वराडचे संचालक राजन माणगावकर यांच्या वतीने आयोजन
61 फार्मर आयडी नोंदणी
तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदार यांनी फार्मर आयडी नोंदणी करावी : तहसीलदार गणेश लव्हे यांचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या सुचनेनुसार तालुक्यातील वराड येथे महा ई सेवा केंद्र वराडचे संचालक राजन माणगावकर यांच्या वतीने आयोजित नवीन फार्मर आयडी नोंदणी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वराड सह परिसरातील गावातील एकूण 61 नवीन फार्मर आयडी नोंदणी करण्यात आली.
वराड तलाठी सौ. कोकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली निशा माणगावकर यांनी नवीन फार्मर आयडी नोंदणी केली. वराड कोतवाल नारायण मसुरकर यांचेही मोलाचे सहकार्य यावेळी लाभले. वराड, कुसरवे, म्हावळुंगे, भंडारवाडा, पाल, तळगाव, गोळवण येथील 61 नवीन फार्मर आयडी नोंदणी करण्यात आली.
*मालवण तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदारांनी आपले फार्मर आयडी काढून घ्यावेत असे आवाहन मालवण तहसीलदार श्री. गणेश लव्हे यांनी केले आहे.*
▪️अमित खोत, मालवण

वराड येथे आयोजित फार्मर आयडी नोंदणी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद..
