दांडी श्रीकृष्णवाडी येथे पारंपरिक
मच्छिमार भूषण धुरी यांच्या निदर्शनास आला...
कांदळवन विभागाने केले रेस्क्यू...
सागरी वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू...
मालवण | प्रतिनिधी :- मालवण दांडी श्रीकृष्ण वाडी येथील पारंपरिक मच्छीमार भूषण धुरी यांना आढळून असलेला दुर्मिळ समुद्र पक्षी "मास्कड बुबी" याला याला वन्यजीव उपचार केंद्र येथे ठेवण्यात आले आहे. त्याच्या वर उपचार सुरू असून हा पक्षी सुखरूप असल्याचे उपचार केंद्रामधून सांगण्यात आले.
मालवण दांडी श्रीकृष्ण वाडी येथे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास येथील पारंपरिक मच्छीमार भूषण धुरी व त्यांचे खलाशी समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. समुद्राच्या लाटांमधून हा पक्षी किनाऱ्याकडे वाहत येत असल्याचे त्यांना दिसून आले. तो पक्षी उडू शकत नसल्याने गणेश तारी यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेला याची माहिती दिली. यावेळी त्या संस्थेने कांदळवन विभागाला माहिती दिली असता कांदळवन चे कर्मचारी रुपेश कांदळगांवकर यांनी भेट दिली व हा पक्षी कांदळवन विभाग जवळ सुपुर्द करण्यात आला.
यावेळी दांडी गाव अध्यक्ष संजिव धुरी, प्रज्योत धुरी, एकनाथ केळुसकर, वसंत(जीजी) धुरी, काशिराम(नाना) तारी व इतर उपस्थित होते. तो पक्षी दमलेला असल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्यास सागरी वन्यजीव उपचार केंद्रात हलवले. कांदळवन विभागाच्या सागरी वन्यजीव उपचार केंद्रा मार्फत रीफ वॉच मरीन काँझर्वेशन चे पशुवैद्य श्री. मनोहर नगरे हे त्या पक्षावर उपचार करत असून पक्षी सुखरूप आहे अशी माहिती उपचार केंद्रातून समजली.

समुद्राच्या लाटांमधून वाहत आला दुर्मिळ समुद्री पक्षी 'मास्कड बुबी'...
