Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

खांबाळे ग्रामपंचायत उपसरपंचपदी मंगेश गुरव यांची बिनविरोध निवड

खांबाळे ग्रामपंचायत उपसरपंचपदी मंगेश गुरव यांची बिनविरोध निवड

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील खांबाळे ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री मंगेश (बंड्या) पांडुरंग गुरव यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पद रिक्त होते.
श्री. मंगेश गुरव हे गावच्या सामाजिक, कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. खांबाळे गावचे उपसरपंच श्री गणेश पवार यांनी पक्षांतर्गत फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद गेले काही महिने रिक्त होते . या पदाकरीता निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला.
उपसरपंच पदाकरीता गुरव यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली श्री गुरव यांचे गावातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सर्वांनी अभिनंदन केले.

ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली आहे सरपंच आणि गावातील ज्येष्ठ आणि अनुभवी सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल.ग्रामपंचायत पातळीवरून ज्या ज्या योजना ग्रामस्थांना देता येथील त्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करेन, असे यावेळी उपसरपंच गुरव यांनी म्हटले

यावेळी ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख श्री मंगेश लोके , सरपंच सौ प्राजक्ता कदम, ग्रामसेवक सौ नयना गुरखे, दिपक चव्हाण, माजी उपसरपंच श्री गणेश पवार, तंटामुक्त अध्यक्ष श्री लवू पवार, चेअरमन श्री प्रविण गायकवाड, पोलीस पाटील टेंबवाडी श्री रुपेश कांबळे, पोलीस पाटील खांबाळे सौ राखी पवार, कॅप्टन राजाराम वळंजू, युवासेनेचे श्री दत्तात्रय परब, श्री सुनिल पवार, श्री शांताराम कदम, श्री प्रमोद लोके, श्री महादेव पवार, माजी सरपंच सौ गौरी पवार, ग्रा प सदस्य सौ नंदा मोरे,सौ रसिका पवार,दिनेश पालकर, श्री सदानंद गुरव, श्री नारायण पवार, महेश पवार,छोटू गुरव, जयेश पवार, प्रसाद कदम, दिपक पवार, सज्जन मोहिते, अरूण माळकर, भास्कर मोहिते,सुशांत गुरव, अंबाजी पवार,राज पवार, प्रकाश पवार, मंगेश कांबळे आदी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom