पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या वतीने पुरस्कृत स्पर्धा
कुंभारमाठ मैदान येथे श्री ब्राम्हणदेव क्रिकेट संघाच्या वतीने 23 व 24 जून रोजी आयोजन
मालवण | प्रतिनिधी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या वतीने पुरस्कृत 'एक गाव एक संघ' पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजन 23 व 24 जून रोजी कुंभारमाठ मैदान येथे श्री ब्राम्हणदेव क्रिकेट संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

विजेत्या संघास १५ हजार रुपये आणि आकर्षक भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

