Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

Bjp : माळगावातील विकास कामांना भरघोस निधी मंजूर

Bjp : माळगावातील विकास कामांना भरघोस निधी मंजूर

भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर

भाऊ भोगले | बागायत : माळगाव बागायत येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन माळगाव सरपंच सौ. चैताली साळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

जिल्हा वार्षिक योजना तसेच जन सुविधा योजने अंतर्गत माळगावमध्ये अनेक विकास कामांना निधी मिळवून देण्याचे काम पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण तसेच माजी खासदार श्री निलेश राणे यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने माळगाव ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी अभावी प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली त्याच बरोबर गावातील अनेक रस्त्यांना भरघोस निधी मिळवून देण्यात आल्याचे सरपंच सौ चैताली साळकर यांनी स्पष्ट केले.

माळगाव गावठणवाडी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे, मधलीवाडी ते मिरवेल रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, लाटकोंडवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, भास्करवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, हुमरसवाडी स्मशानशेड बांधणे, तसेच सकेरा पुलाशेजारी संरक्षण भिंत बांधणे अशा विकास कामांना भरघोस निधी मिळवून देण्याचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच माजी खासदार नीलेश राणे यांनी केले असल्याने सरपंच सौ. चैताली साळकर यांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक सावंत मालवण तालुकाध्यक्ष श्री धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सभापती तसेच भाजपा पोईप मतदारसंघ प्रभारी श्री राजेंद्र प्रभुदेसाई, पोलीस पाटील श्री किशोर जाधव, ग्रामसेवक माळगाव युगल प्रभुगावकर, उपसरपंच शशिकांत सरनाईक , ग्रा.सदस्य श्रीनिवास हडकर, राजश्री शेलार, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख निलेश खोत, दया देसाई, लिपिक प्रवीण जाधव, डाटा ऑपरेटर पिंटू परब, सुधीर पडेलकर, सिद्धेश खोत, पार्थ खोत, सुरज धामापूरकर, गौतम खोत, विश्वनाथ भोगले, तातू भोगले, सुनील भोगले, अनिल भोगले, साईराज परब, नागेश परब, गुरू परब, चेतन साळकर, दयानंद देसाई, पांडुरंग धामापूरकर, दिपक बागवे, हरी चव्हाण, मनोज चव्हाण, भरत शेलार, संतोष सरनाईक, प्रियांका बागवे, सचिन साळकर, समीर साळकर तसेच माळगाव गावठणवाडी येथील ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.

rapan bottom