Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 2 कोटी 70 लाख निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 2 कोटी 70 लाख निधी मंजूर


मालवण-कुडाळ तालुक्यात समाज मंदिर इमारत बांधकाम व अंतर्गत सुविधा निर्मिती होणार 

16 ठिकाणी विकासनिधी मंजूर : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण-कुडाळ तालुक्यातील 16 ठिकाणी समाजमंदिर इमारत बांधकाम व अंतर्गत सुविधा निर्माण करणे यासाठी सुमारे 2 कोटी 70 लाख निधी आमदार निलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

विकासनिधी मंजुरीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहेत.

मंजूर कामांमध्ये किर्लोस चव्हाणवाडी समाजमंदिर इमारत बांधकाम करणे. ता. मालवण 20 लक्ष, कुणकवळे बौद्धवाडी समाज मंदिर येथे अंतर्गत सुविधा निर्माण करणे. ता. मालवण 10 लक्ष, सुकळवाड पाताडेवाडी समाजमंदिर येथे अंतर्गत सुविधा निर्माण करणे. ता. मालवण 10 लक्ष, डिगस येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ 20 लक्ष, सिंधुदुर्गनगरी ओरोस बौध्दवाडी येथे समाज मंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ 20 लक्ष, बाव आंबेडकरनगर येथे समाज मंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ 20 लक्ष, केरवडे तर्फ माणगाव येथे समाज मंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ 20 लक्ष, आंब्रड तांबेवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ 20 लक्ष, नारूर हरिजनवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. कुडाळ 20 लक्ष, वेताळ बांबर्डे कपिल नगर समाज मंदिर विस्तारीकरण व अंतर्गत सुविधा निर्माण करणे. ता. कुडाळ 10 लक्ष, असगणी बौद्धवाडी येथे २ सोलर हायमास्ट उभारणे. ता. मालवण 10 लक्ष, कांदळगाव बौद्धवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण 20 लक्ष, ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर रमाईनगर मागासवर्गीय वस्ती मध्ये २ सोलर हायमास्ट बसविणे. ता. मालवण 10 लक्ष, ओवळीये बौद्धवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण 20 लक्ष, वायंगणी येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण 20 लक्ष, वडाचापाट येथे समाजमंदिर बांधकाम करणे. ता. मालवण 20 लक्ष असा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण 2 कोटी 70 लक्ष निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom