आमदार वैभव नाईक यांनी निधी मंजूर करुन दिला
माजी नगरसेवक मंदार केणी यांची माहिती
मालवण : मालवण शहरातील धुरिवाडा कासवकर स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन जेष्ठ शिवसैनिक सावबा यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार वैभव नाईक यांनी निधी मंजूर करुन दिलेला शब्द पूर्ण केला. असे सांगत माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवंकर, भाई कासवकर यांनी आभार मानले.
यावेळी शहर प्रमुख बाबी जोगी, भूषण कासवकर, पद्माकर पराडकर, राजू सावंत, महेश सावंत, गोविंद खोर्जे, विनायक मंचेकर, साई सुशील तारीवाघ दादा जोशी, विलास वेंगुर्लेकर मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते धुरिवडा येथील नागरिकांनी आमदार वैभव नाईक यांचे विशेष आभार मानले. तसेच यासाठी पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवंकर, भाई कासवकर यांचेही आभार मानण्यात आले.

