Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजुर

शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजुर


केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिले आरोग्य शिक्षणाचे नवे दालन

माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे,पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

१० कोटींचा निधी मंजुर, केंद्र सरकार देणार ६० टक्के निधी

सिंधुदुर्ग :
केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्याच्या ” योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. या प्रत्येक महाविद्यालयाला प्रत्येकी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजला संलग्न बीएससी नर्सिंग महाविद्यालय नव्याने मंजूर झाले असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य शिक्षणाचे नवे दालन खुले झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यानिमित्ताने यश आले आहे. तर माजी केंद्रिय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला केलेल्या पत्रव्यवहाराला यश आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असल्याने १० कोटीचा निधी या नरसिंग कॉलेज साठी मंजूर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर झाले असल्यामुळे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी सुविधा निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षण व प्रशिक्षणाची संधी मिळणार असून, भविष्यात कुशल परिचारिका तयार होऊन जिल्ह्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्याचा या योजनेत समावेश झाल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

rapan bottom