मालवण : दहावी आणि बारावी परीक्षा २०२५-२६ मध्ये उत्तीर्ण झालेले मालवण तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ १२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता धुरीवाडा येथील संस्कार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रती ५ जुलैपर्यंत आपआपल्या भागातील मालवण गाबित समाज कार्यकारिणी सदस्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर 9405013448 यांनी केले आहे.
मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीची गुणगौरव समारंभ नियोजन बैठक गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्थेत आज २१ जून रोजी पार पडली. नावनोंदणीसाठी डॉ. प्रमोद कोळंबकर - अध्यक्ष, पवनकुमार पराडकर - आचरा. आनंद खडपकर - तळाशील. सर्जेकोट/कोळंब/मालवण शहर -भाई कासवकर आणि अनुष्का मालंडकर (धुरीवाडा). नरेश हुले, पूजा सरकारे, दादा वाघ, राधिका कुबल (मेढा-राजकोट). सेजल परब, अन्वेषा आचरेकर आणि भाऊ मोरजे (दांडी).
मिथुन मालंडकर आणि संतोष , ढोके (वायरी). सहदेव साळगावकर (तारकर्ली-देवबाग). दिक्षा ढोके (भरड). यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मालवण तालुका गाबित समाजतर्फे १२ जुलै रोजी गुणवंतांचा सत्कार
