Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


मालवण नगरपरिषद व सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभाग यांचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे गरजेचे आहे. आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण येथे बोलताना केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मालवण नगरपरिषद आणि स. का. पाटील महाविद्यालय एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी येथे आयोजित भव्य योग कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी विचार मांडले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष ममता वराडकर, तहसीलदार गणेश लव्हे, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, प्राचार्य कैलास राबते, एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनन एम. आर. खोत, योग योज्योती ग्रुप मालवणच्या दीपाली वनकुंद्रे, डॉ. बालाजी पाटील, नगरसेविका मेघा सावंत, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर, नगरसेवक विकी तोरसकर यांसह योगा मार्गदर्शक समीक्षा चव्हाण, कमल कुमठेकर, निर्झरा कांबळी, पुजा वनकुंद्रे यांसह नगरपरिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग, महसूल विभाग, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, एनसीसी विभाग, आयुष विभाग सिंधुदुर्ग, वसुंधरा जनकल्याण फाउंडेशन, मेरा युवा भारत सिंधुदुर्ग यांसह विविध सामाजिक संस्था, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मालवण बंदर जेटी येथे समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि योगप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यासाचा अनुभव घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, “भारताने जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी आज संपूर्ण जगाने स्वीकारली आहे. योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती आहे. नियमित योगाभ्यासामुळे विविध आजारांपासून संरक्षण मिळते, मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होते.” दररोज काही वेळ योगासाठी देण्याचे आवाहन करत निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संदेश दिला. योगामुळे वैयक्तिक आरोग्या बरोबरच समाजाच्या आरोग्यदायी विकासालाही चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी आपल्या मनोगतात योगाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनासाठी योग अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून निरोगी राहावे असे त्यांनी सांगितले.

योग दिनाच्या निमित्ताने आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मालवण नगरपरिषद, स. का. पाटील महाविद्यालय, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योगाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न यावेळी करण्यात आला. प्रा. एम. आर. खोत यांनी सर्वांचे आभार मानले.
सिंधुदुर्गची खरी शान मालवण : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गची खरी शान मालवण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले सिंधुदुर्ग व किल्ले राजकोट यांच्या साक्षीने समुद्राच्या सानिध्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला. मालवण नगरपरिषद, सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभाग यांनी शिस्तबद्ध आयोजन केले. उत्साहात योग दिन साजरा झाला. असे सांगत जिल्हाधिकारी तुप्ती धोडमिसे यांनी योग दिन आयोजनाचे विशेष कौतुक केले.
▪️अमित खोत, मालवण

▪️सर्व छायाचित्र : गणेश गांवकर, मालवण

rapan bottom