आयुष्याच्या प्रवासात संघर्ष, जिद्द आणि परिश्रमांची जोड असेल, तर कोणत्याही अशक्य गोष्टीला शक्य करता येते. हे गुण ज्यांच्याकडे असतात, ते केवळ स्वतःचे नशीब बदलत नाहीत, तर इतरांसाठीही एक दीपस्तंभ बनतात. मालवण तालुक्यातील असेच एक कणखर आणि यशस्वी नेतृत्व भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर हे होय....!

सोबतच दूरदृष्टी, वैचारिक प्रगल्भता, विकासाचा दृष्टिकोन आणि संघटन कौशल्य या विशेष गुणांमुळे धोंडी चिंदरकर खऱ्या अर्थाने 'धुरंदर' नेतृत्व ठरतात.
मालवण तालुक्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठया आणि निसर्गसंपन्न अश्या चिंदर गावचे धोंडी चिंदरकर हे सुपुत्र. नदी, तलाव, किल्ला, मंदिरे अर्थात ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्ग व कृषी संपन्नतेचा ठेवा असलेल्या चिंदर गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात धोंडी चिंदरकर यांचा जन्म झाला. शेतकरी म्हणजेच खऱ्या अर्थाने जमिनीशी घट्ट नाळ जुळलेले हे नेतृत्व जिद्द, संघर्ष आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर घडत गेले आणि यशस्वी ही ठरले.
1990 च्या दशकात अगदी 16 व्या वर्षी धोंडी चिंदरकर यांचा राजकारणात प्रवेश झाला. 1992 या वर्षी शिवसेना शाखा प्रमुख म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 1995 मध्ये चिंदर विकास संस्था चेअरमन, सडेवाडी-तेरई प्रभागातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी होत 2000 ते 2005 चिंदर गावचे उपसरपंच तर 2005 ते 2007 या कार्यकाळात त्यांनी चिंदर गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच पद भूषवले. 2007 मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झालेल्या धोंडी चिंदरकर यांनी 2011 यावर्षी मालवण तालुक्याचे सर्वोच्च लोकप्रतिनिधी पद अर्थात सभापती म्हणून लोकाभिमुख यशस्वी कार्यकाळ करत नावलौकिक प्राप्त केला.
दरम्यानच्या काळात त्यांनी विविध संस्थावर काम केले. सिंधुदुर्ग जिल्हा संघर्ष समिती सरचिटणीस, तंटा मुक्तीअध्यक्ष अशी पदे भुषवली आणि त्या पदाला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला. सोबतच सलग तीन टर्म भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. सलग तीन टर्म तालुकाध्यक्ष पद प्राप्त करणारे बहुदा ते एकमेव तालुकाध्यक्ष ठरले आहेत. त्यांच्या यशस्वी कार्याचा आणि संघटन कौशल्यांचा पक्षाने केलेला हा बहुमान ठरला आहे. आगामी काळातही पक्षाकडून त्यांना निश्चितच महत्वाची जबाबदारी असेल यात शंका नाही.
धोंडी चिंदरकर सांगतात, आपल्या राजकीय प्रवासात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेबांच्या विचाराचा पगडा नेहमीच राहिला. मान. कै विठ्ठल चव्हाण, आमदार मान. कै रमेश मोरे, मान. गुरुनाथ खोत यांचं मार्गदर्शन महत्वपूर्ण राहिले. राजन गावकर व कै. हरिशंद हडकर यांनीच राजकारणात आणलं. भाई गोवेकर, अरविंद मांजरेकर, अशोक लोके यांचं मोलाचं सहकार्य मिळाले. सरोज परब, शर्वरी पाटकर, अशोक सावंत हे नेहमीच पाठीशी राहिलेत. मागील दशकापासून विचार करता मान. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब, आमदार निलेशजी राणे राणे साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ही सर्व नेते मंडळी नेहमीच ताकदीने पाठीशी उभी राहिलीत.
भाजपा जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर हे सुरवाती पासून मार्गदर्शक राहिलेत. तर संघटनामक कामात महेश मांजरेकर, विजय निकम व सर्व सहकारी यांचे योगदान संघटन प्रवासात मोलाचे आहे. सर्व पदाधिकारी वं सहकारी यांच्याच मुळे राजकारणात खंबीर राहिलो. राजकीय जीवनात मिळवलेले यश आणि आता तीन टर्म भाजपा तालुकाध्यक्ष म्हणून मिळालेला बहुमान व त्यातील यश हे सर्व पदाधिकारी व सर्व सहकारी यांना समर्पित आहे. असे चिंदरकर सांगतात.
श्री देव रामेश्वर, देवी भगवती माऊली यांच्यावर अपार श्रद्धा भक्ती असलेले हे नेतृत्व देवतांच्या आशीर्वादाने राजकीय, सामाजिक सेवा कार्यात यशस्वी वाटचालीस करत असताना, पक्ष संघटना म्हणून काम करतं असताना सर्वाना सोबत घेऊन जाणारे हे नेतृत्व सामाजिक सेवा कार्यातही नेहमीच अग्रेसर राहिले. गाव विकासातही त्यांचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले. तालुकाध्यक्ष म्हणून कार्यकाळात प्रत्येक निवडणुकीत पक्ष संघटनेला यश प्राप्ती नेहमीच राहिली. राजकीय वाटचालीत एक 'गुडलक' धोंडी चिंदरकर यांच्या सोबत नेहमीच राहिले. अश्या या कर्तृत्ववान नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
▪️अमित खोत | मालवण

