Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

गाबीत समाज चिंतन शिबिराचे पनवेल येथे १८ व १९ जुलै रोजी आयोजन..

गाबीत समाज चिंतन शिबिराचे  पनवेल येथे १८ व १९ जुलै रोजी आयोजन..


मालवण | प्रतिनिधी :- गाबीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाज संघटनेतील एकजुटीने कार्य करण्यासाठी एकत्रित विचारमंथन करण्याच्या दृष्टीने शनिवार दि. १८ व १९ जुलै रोजी निवासी चिंतन शिबिराचे आयोजन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्या अधिप्त्याखाली एम. जे. रिसॉर्ट बु. उसर्ली, पनवेल येथे करण्यात आले आहे.

दि. १८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता दीपप्रज्वलन व शिबीर उद्घाटन होणार असून यावेळी अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर उपास्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन गणपत (बाळ) मणचेकर करणार आहेत. सायं. ४. १५ वा. गाबीत समाज मुंबईचे अध्यक्ष सुजय धुरत यांचे मनोगत सायं. ५ वा. - संघटना व प्रशासकीय कामकाज- चंद्रशेखर उपरकर (अध्यक्ष सिंधुदुर्ग गाबीत समाज), सायं. ६ वा. समाज कार्यकर्ता प्रबोधन - रतनकुमार झाजम (कार्याध्यक्षः अ. भा. गा. स. महासंघ), सायं. ७ वा. - गाबीत समाज इतिहास - नारायण आडकर (अ.भा.गा. समाज महासंघ), वासुदेव मोंडकर (माजी सरविटणीस अ.भा.गा.समाज महासंघ गाबीत), रात्री ८ वा. मुक्त संवाद व कार्यकर्ता चर्चा - अशोक पराडकर, धर्माजी पराडकर, सुदर्शन सारंग, रात्री १० वा. स्नेह भोजन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दि. १९ जुलै रोजी सकाळी ९. १० वा. पर्यटन व समाज - मार्गदर्शक - शाम चौघुले, सकाळी १० वा. मत्स्य शेती व राज्य योजना - ऍड. काशिनाथ तारी (ज्येष्ठ नेते व उद्योजक), सकाळी ११ वा. सहकार व समाज - नंदकुमार हरम (उद्योजक) दुपारी १२ वा. परशुराम उपरकर यांचे अध्यक्षीय भाषण, दुपारी १ वा. स्नेहभोजन, दुपारी ३ वा. कार्यकर्ता संवाद कार्यक्रम होऊन समारोप होणार आहे.

तरी गाबीत समाज सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी तसेच मालवण, देवगड, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली येथील गाबीत समाज पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या आणि गाबीत समाजातील नगरसेवक, पंचायत समिती सदस्य अथवा ग्रामपंचायत सदस्य, तथा इच्छुक विविध संस्था पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती नोंद करून समाजासाठी एकसंघ काम करण्याची संधी प्राप्त करावी आणि समाज कार्यात सहभाग घ्यावा. शिबिरात सहभागी होण्यासाठी ५ जुलै पर्यंत नावनोंदणी करावी. प्रवेश शुल्क पाठविण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्री. बाळा ऊर्फ गणपत मणचेकर (सरचिटणीस- गाबीत समाज महासंघ, मुंबई) - ९८१९७८१०१८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर व सरचिटणीस महेंद्र पराडकर यांनी केले आहे.

rapan bottom