काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर यांसह पदाधिकारी यांची उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून मालवण काँग्रेस पक्षाच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकार यांसह पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, वैद्यकीय अधिकारी बालाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नाडिस, जेष्ठ नेते श्रीकृष्ण तळवडेकर, मधुकर लुडबे, महिला शहर अध्यक्षा सौ. रुपाली फर्नाडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम....
