चिंदर | प्रतिनिधी : चिंदर गावात ग्रामस्थांची मागणी असलेली मात्र गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेली गावातील वाडीवस्तीला जोडणारी 16 पेक्षा जास्त विकासकामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुर्ण केली. अनेक विकासकामे स्व निधीतून मार्गी लागली आहेत. याबाबत सर्व ठिकाणी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान ग्रामस्थांची अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामे पुर्ण केल्या बद्दल बारापाच मानकरी व वतनदार यांच्या वतीने तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गांवकर यांच्या निवासस्थानी हा सत्कार करण्यात आला. अशी माहिती मनोज हडकर यांनी दिली आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपतालुकाप्रमुख मंगेश गांवकर, चिंदर विभाग प्रमुख पंढरीनाथ उर्फ भाऊ हडकर, शाखाप्रमुख दत्ता वराडकर, शशी नाटेकर यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

चिंदर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार
