कोट्यावधी निधीतील विविध विकास कामांची गावागावात भूमिपूजन
भाजपा नेते निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
विकासनिधी बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत निलेश राणे यांचे मानले आभार
मालवण : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. राज्यात शिंदे, फडणवीस सरकारच्या माध्यमातून गतिमान विकास सुरु आहे. विकासाची ही गंगा अशीच वाहती राहणार आहे. खासदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून हक्काचा निधी गावागावात प्राप्त होत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी विकासनिधी प्राप्त होत असताना कुडाळ मालवण तालुक्यातील मागील दहा वर्षांचा विकासाचा दुष्काळ संपवायचा आहे. यापुढे या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने हक्काचा आमदार असेल. मालवण कुडाळ मतदारसंघ राज्यातील टॉप 5 मतदार संघात असेल. असा विश्वास भाजपा नेते निलेश राणे यांनी मालवण दौऱ्यात व्यक्त केला.

मालवण तालुक्यात कोट्यावधी विकासनिधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
वराड, आनंदव्हाळ, कोळंब, हडी, आचरा, आडवली, मठ बुद्रुक पाणलोस, डांगमोडे-मसुरे, बागायत, गोळवण या ठिकाणी जिल्हा वार्षिक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना तसेच विविध शासकीय योजना माध्यमातून प्राप्त निधीतून मंजूर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. पाणलोस, डांगमोडे येथे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर रस्ता कामाबाबत तसेच सर्व विकास कामांबाबत प्रत्येक गावात ग्रामस्थांनी निलेश राणे यांचे आभार मानत सत्कार केला.


यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले मालवण कुडाळ मतदार संघात गेल्या दहा वर्षात येथील आमदारनी केवळ पत्रांचा पाऊस पाडला. प्रत्यक्षात काम झालीच नाहीत. अनेक रस्ते खड्डेमय बनले. गावात विकास निधी नाहीच अशी स्थिती होती. मात्र युती सरकार राज्यात सत्तेत आले आणि विकास गतिमान झाला. या ठिकाणी निलेश राणे यांनी विशेष लक्ष टाकले मोठा विकासनिधी गावागावत दिला. केंद्र सरकारने पंतप्रधान ग्रामसडक योजना पुन्हा सुरु केली. अनेक रस्ते त्या निधीतून खा. नारायण राणे साहेब यांनी आणले. काही रस्ते विशेष प्रयत्नातून निलेश राणे यांनी मंजूर करण्यात महत्वाची भुमिका बजावली. काही रस्ते अधिकच नादुरुस्त होते. त्यांना प्रसंगी अधिक निधी लागला तर तो ही मंजूर करू. प्रसंगी खिशातुन देऊ मात्र विकासकामे पुर्ण झाली पाहिजेत ही भुमिका निलेश राणे यांची राहिली. असे सांगत धोंडी चिंदरकर म्हणले असे आमदार या मतदार संघाला हवेत. जनतेची मागणी लवकर पुर्ण होईल असा विश्वास चिंदरकर यांनी व्यक्त केला.






यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, तालुका प्रभारी आप्पा लुडबे, शहर प्रभारी संतोष गांवकर, सतीश वाईरकर, संतोष साटविलकर, राजन माणगावकर, महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, सरपंच शलाका रावले, सभापती अजिंक्य पाताडे, चेतन मुसळे, आनंदव्हाळ सरपंच रश्मी टेंबूलकर, रवी टेंबूलकर, कोळंब सरपंच सिया धुरी, माजी सभापती अनिल निव्हेकर, प्रतिमा भोजणे, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, आचरा सरपंच जे्रॉन फर्नांडिस, उपसरपंच मिराशी, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, कपिल गुरव, बाबू परुळेकर, राजन पांगे, बाबू कदम, मुजफ्फर मुजावर, अवधूत हळदणकर, आचरा माजी सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती राजु परुळेकर, निलेश बाईत, सरपंच बाळा वेंगुर्लेकर, उपसरपंच विनायक बाईत, विभाग प्रमुख प्रशांत परब, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभी लाड, माजी जिप अध्यक्ष सरोज परब, महेश बागवे, लक्ष्मी पेडणेकर, माजी उपासभापती छोटू ठाकुर, बुवा, बाबू आंगणे, शिवाजी परब, माजी सभापती राजु प्रभुदेसाई, माळगांव सरपंच चौताली साळसकर, गोळवण सरपंच सुभाष लाड, पाताडे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ प्रत्येक ठिकाणी मोठया संख्येने उपस्थित होते.




बजेटमध्ये उल्लेख नाही अशी पत्रे रद्दीच
निवडणुक तोंडावर विकासकामाबाबत पत्रे देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम येथील आमदार करत आहे. बजेट मध्ये उल्लेख नाही अशी पत्रे काही कामाची नाही. मात्र हे आता जनतेने ओळखले आहे, जनता आमदारांना जागा दाखवेल. या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे निलेश राणे म्हणाले.









