Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

शिक्षक गौरव नाईक यांची केंद्रप्रमुखपदी नियुक्ती

शिक्षक गौरव नाईक यांची केंद्रप्रमुखपदी नियुक्ती


मालवण : शासकीय शिक्षण क्षेत्रात आपल्या अथांग कष्टाने आणि जिद्दीने वेगळी ओळख निर्माण करणारे श्री. गौरव नाईक पेंडूर यांची नुकतीच केंद्र कट्टा, तालुका - मालवण येथे 'केंद्रप्रमुख' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवणाऱ्या श्री. नाईक यांच्या या नियुक्ती नंतर शिक्षण वर्तुळातून आणि समाजमाध्यमांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री. गौरव नाईक यांनी शिक्षक म्हणून नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या याच निष्ठेची आणि अविरत कार्याची पावती म्हणून शासनाकडून त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री गौरव नाईक हे नुकतेच शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम. एड.) मध्ये अ+ श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. उच्चशिक्षित असलेल्या श्री. नाईक यांना अभ्यासाची आणि ज्ञानाची प्रचंड ओढ आहे. उत्तम शिक्षणप्रेमी असण्यासोबतच त्यांनी विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये देखील घवघवीत यश संपादन करून आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

नुकताच त्यांनी यावर्षीच्या राज्यस्तरीय विज्ञान आणि गणिताचा जादूगार स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक नवोपक्रमांची व शैक्षणिक प्रतिकृतींची राज्यस्तरावर निवड झालेली आहे. एक समर्पित, कर्तव्यदक्ष आणि गौरवस्पद कामगिरी करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी यशाचे हे नवे पर्व घडवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत त्यांनी मिळवलेले हे यश अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना त्यांच्या हितचिंतकांनी व्यक्त केल्या आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात असून, त्यांच्या पुढील भावी वाटचालीस व प्रशासकीय कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

rapan bottom