Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

रोझरी इंग्लिश स्कूल मालवण | दहावीतील विशेष गुणवंतांचा गुणगौरव...

रोझरी इंग्लिश स्कूल मालवण |  दहावीतील विशेष गुणवंतांचा गुणगौरव...


मालवण | प्रतिनिधी : मालवण रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेमधून शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ दरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षेतील विशेष गुणवंतांचा गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक रेवरंड फादर अन्थोनी डिसोज़ा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मानद अतिथी रेवरंड फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

रोझरी इंग्लिश स्कूलमधून २०२५ -२०२६ या शालेय शैक्षणिक वर्षात ३९ विद्यार्थ्यांना विशेष प्रविण्य श्रेणी प्राप्त झाली असून ९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. यामध्ये कु. पार्थ उदय बागवे याने ९७. ४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. मधुरा विक्रम परब हिने ९६% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तृतीय क्रमांकावर कु. समर्थ विजय यादव व कु. वंशिका मनोज रावले या दोघांनी ९५. ८०% गुण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक प्राप्त केला.
मान्यवरांच्या हस्ते विशेष गुणवतांचा त्यांच्या पालकांसमवेत शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व उपयुक्त भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना उपयुक्त भेटवस्तू व पुष्प देत गौरविण्यात आले.

या दरम्यान, विद्यार्थी विद्यार्थिनींसाठीच्या विविध शालेय शिष्यवृत्तींचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रेवरंड फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व पुढील सर्वांगीण वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

यावेळी मुख्याध्यापक रेवरंड फादर ॲन्थोनी डिसोज़ा यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मेहनतीची प्रशंसा केली तसेच सर्व शिक्षकांच्या समर्पण व योगदानाविषयी विशेष आनंद व्यक्त केला.शिक्षकांच्या वतीने, शिक्षिका ग्रॅमा आल्मेड़ा यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीने, कु. पार्थ उदय बागवे, कु. वंशिका मनोज रावले व कु. मधुरा विक्रम परब यांनी मनोगत व्यक्त करत प्रशाला व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पालकवर्गाच्या वतीने श्री. उदय बागवे व सौ. श्वेता विजय यादव यांनी मनोगत व्यक्त करताना रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेची शिस्त, शिक्षकांचे अहोरात्र समर्पण आणि संस्थेच्या मुलांसाठीच्या सर्वांगीण विकासाप्रती असलेल्या जाणीवांना अधोरेखित करत प्रशंसा केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मारिया लुईस फर्नांडिस यांनी केले तर शिक्षिका सुजाता मुणगेकर यांनी सहसूत्रसंचालन केले शिक्षिका डायना डिसोज़ा यांनी सर्वांचे आभार मानले.

rapan bottom