Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

राज्य सरकारचे सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ मच्छिमार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल

राज्य सरकारचे सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ मच्छिमार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल

मालवण शहर भाजपा अध्यक्ष विष्णु मोंडकर यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण | प्रतिनिधी : राज्यात महायुतीचे सरकार मच्छिमारांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कार्य करत असून महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करून ७२० की.मी. कोकण किनारपट्टीवर वसलेल्या मच्छिमारांसाठी क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या १२१ की.मी वसलेल्या २५ हजार कुटूंबासाठी यांचा लाभ होणार आहे. असा विश्वास मालवण शहर भाजपा अध्यक्ष विष्णु मोंडकर यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास राज्यसरकारने मान्यता दिली. या माध्यमातून सागरी क्षेत्रातील मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे, परंपरागत मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांचे हित जतन करणे, सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या मच्छिमारांना रोजगारांच्या संधी निर्माण करणे, मासेमारी उत्पन्न, विक्री त्यावरील प्रकिया उद्योग याबाबतीत शासनास उपाय सुचविणे, मासे सुकविणे मासे वाळविणे विक्री तसेच मासे जास्त काळ टिकून राहण्यासाठी उपाय सुचविणे, मच्छिमार समाजाच्या आर्थिक व सामाजिक स्तर वाढविण्यासाठी कार्य करणे. हा प्रमुख उद्धेश या सागरी मच्छिमार कल्याणकारि महामंडळाचा उद्धेश असून महाराष्ट्र राज्य मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्वायत्त व स्वयंपुर्ण असावे यासाठी राज्यसरकार कडून एकावेळचे ५० कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. सदर मंडळाचे अध्यक्ष मत्स्यव्यवसाय मंत्री उपाध्यक्ष राज्यमंत्री मत्स्यव्यवसाय, सचिव मत्स्यव्यवसाय, उपसचिव मत्स्यव्यवसाय, सागरी सहआयुक्त मत्स्यव्यवसाय, जिल्हास्तरीय संस्था ५ प्रतिनिधी अशी रचना असणार आहे. अश्या प्रकारचे मच्छिमारांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्य करणारे मंडळ होण्यासाठी भाजपा मालवण, गाबीत फिशरमन फेडरेशन अध्यक्ष व राज्य मत्स्यधोरण समिती सदस्य म्हणून मी सातत्याने मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीरजी मुनगंटीवार, सिंधुदुर्ग, पालघर पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सदर मागणी मान्य झाल्याने मच्छिमार समाजाच्या सर्वागीण विकासासाठी दिशादर्शक ठरेलं. अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष मालवण शहर मंडळ भारतीय जनता पार्टी यांनी दिली.

rapan bottom