शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या वतीने भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर व भाजपा पदाधिकारी यांचे मानले आभार
मालवण : मालवण तालुक्यातील रेवतळे प्राथमिक शाळेचे छप्पर दुरुस्ती व डागडुजी करणे कामासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर अंतर्गत छप्पर नूतनीकरण कामासाठी ४ लाख रुपयांचा निधी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. अशी माहिती भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली.
निधी मंजूर केल्याबद्दल शिक्षक, पालक, व ग्रामस्थांच्या वतीने दीपक पाटकर व भाजपा पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले आहेत.
यावेळी दीपक पाटकर यांसह भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बाबू वायंगणकर, राजन बांदेकर, शिक्षक महादेव घोडके, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी नगराध्यक्षा अर्चना मिठबावकर, सुभाष मिठबावकर, राजा मांजरेकर, राजन बादेकर , भालचंद्र राऊत, पंकज पेडणेकर, कॅलिस फर्नांडिस, टेलेस डिसोझा, सूरज भगत, बाबू शिंदे, प्रतीक परब, महेश मांजरेकर, धनंजय मिठबावकर, प्रदीप मांजरेकर, प्रसन्ना कांबळी, परशुराम पाटकर आदी उपस्थित होते.

रेवतळे प्राथमिक शाळा छप्पर नूतनीकरणसाठी सुमारे ४ लाख ६६ हजार निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर
