Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

मालवण दांडी आवार येथे तात्पुरते सागरी कासव व सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा शुभारंभ....!

मालवण दांडी आवार येथे तात्पुरते सागरी कासव व सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा  शुभारंभ....!


जागतिक कासव दिनाचे औचित्य कांदळवन विभाग आणि रीफ वॉच मरीन कन्झर्वेशन (गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन.

दांडी आवार फिशरीज ट्रेनिंग सेंटर इमारती मध्ये होणार सागरी कासव व सागरी वन्यजीव यांच्यावर उपचार.

राहुल जाधव | प्रतिनिधी: जागतिक कासव दिनाचे औचित्य साधून मालवण दांडी येथे तात्पुरते सागरी कासव व सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर कानसे यांच्या उपस्थिती करण्यात आला.


मालवण दांडी आवार येथील मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रशिक्षण केंद्र(फिशरीज ट्रेनिंग सेंटर) येथे 16 जून जागतिक कासव दिनानिमित्त कांदळवन विभाग आणि रीफ वॉच मरीन कन्झर्वेशन (गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक आयुक्त तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर कानसे, मत्स्यविभागचे श्री. र. ग. मालवणकर व अनिकेत बोधले, RFO महादेव शिंगाडे, कांदळविभागाचे पदाधिकारी, नीलक्रांतीचे रविकिरण तोरसकर, वनशक्तीचे यथार्थ खावणेकर, YBFC अध्यक्षा मेगल डिसोझा व युथ बिट्स फॉर क्लायमेट चे सदस्य, कासव मित्र, वनरक्षक, वाईल्ड लाईफ रेस्क्युअर सिंधुदुर्ग, दक्षिण फाउंडेशनच्या स्नेहा गामरे यांच्या समवेत प्रियांका वायंगणकर व पूर्वा पराडकर, स्वराज्य संघटना अध्यक्षा शिल्पा खोत, हरिश्चंद्र खोबरेकर, श्री. सन्मेष परब, भूषण जुवटकर व इतर पर्यावरण मित्र आणि नागरिक उपस्थित होते.


 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासव विणीचा जन्मदर सर्वाधिक नोंदविण्यात आला आहे. किनारपट्टीवरील समुद्री कासव संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात चालते. मालवणच्या किनाऱ्यावर देखील हे सागरी कासव अंडी घालण्यासाठी येतात. बऱ्याचदा हे कासव जखमी अवस्थेत आढळतात. त्यांच्या त्वरित उपचारासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते. हीच परिस्थिती इतर सागरी वन्यजीवांची सुध्दा आढळून येते. त्यासाठीच कांदळवन विभाग व रीफ वॉच मरीन कन्झर्वेशन (गोवा) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ह्या तात्पुरत्या उपचार केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.

या तात्पुरत्या उपचार केंद्राचा जास्तीत जास्त वापर करून घ्यावा आणि सागरी कासव व सागरी वन्यजीवांचे संरक्षण करावे. नागरिकांनी सागरी कासव व वन्यजीव संबंधित उपचार, माहिती व सहकार्यासाठी वनपरिक्षेत्र कांदळवन, मालवण 02365 252260 व वनपाल मालवण 9604022738 यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन यावेळी नागरिकांना कार्यक्रमा प्रसंगी करण्यात आले.

rapan bottom