Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता


मालवण | प्रतिनिधी : घरगुती वादातून तोंडावर उशीने दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातून संशयित आरोपी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याकामी संशयित आरोपी तर्फे ॲड. उल्हास कुळकर्णी, ॲड प्राची कुळकर्णी, ॲड अमेय कुळकर्णी यांनी काम पाहीले.

फियार्दी हिच्या दि १० ऑगस्ट २०२१ रोजीच्या तक्रारी वरून आरोपी क्र. १ विजय घाडीगावकर आरोपी क्र. २ सौ. अस्मिता विजय घाडीगावकर आरोपी क्र. ३ अनिकेत घाडीगावकर यांचे विरुद्ध भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबतची फियार्द अशी की, आरोपी नं. १ याचेशी फियार्दीने ५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रेम विवाह केलेला असून आरोपी क्र. २ ही आरोपी नं १ ची पहिली पत्नी आहे. व आरोपी नं. ३ हा आरोपी नं १ व २ यांचा नात्याने मुलगा आहे. यातील फियार्दी व आरोपीत सुमारे दिड वर्षा पासून घरगुती वाद निर्माण झाले होते. त्यातून आरोपी क्र. ०१ ते ०३ यांनी एकमेकांचे संगनमताने व साहाय्याने फियार्दी ही तिचे राहते घरी झोपली असताना १० ऑगस्ट २०२१ रोजी आरोपी क्र. ०१ यांनी तिचे दोन्ही पायांवर बसून तिचे दोन्ही हात पकडून ठेवले व आरोपी क्र. २ व ३ यांनी आरोपी क्र. १ याचे सांगणेवरून फियार्दीचे तोंडावर उशीने दाबून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फियार्दीला धकलाबुकल करून शिवीगाळी केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशी फियार्द फियार्दीने आचरा पोलीस ठाणे येथे दिली होती.

त्यानुसार आरोपींविरुद्ध भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना ११/०८/२०२१ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपींची जामीनावर मुक्तता झालेली होती. त्यानंतर ओरोस येथील मे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब सिंधुदुर्ग यांचे समोर सेशन केस नं ६२/२०२१ ची सुनावणी होऊन संशयाचे पलीकडे जावुन फिर्यादी पक्षाला केस शाबित करता आली नाही तसेच सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या पुराव्यातील त्रुटी, विसंगती यांचा विचार करता मे न्यायालयाने आरोपीना संशयाचा फायदा देऊन सर्व गुन्हयातुन आरोपी नं १ ते ३ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याकामी आरोपी तर्फे ॲड. उल्हास कुळकर्णी, ॲड प्राची कुळकर्णी, ॲड अमेय कुळकर्णी यांनी काम पाहीले.

rapan bottom