Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

मालवणात सीएनजी पंप शुभारंभ

मालवणात सीएनजी पंप शुभारंभ


श्रीनिवास ऑटो सेंटर पेट्रोलपंप येथे सीएनजी पंप सुविधा सुरु

मालवण | प्रतिनिधी :
मालवण शहरातील श्रीनिवास ऑटो सेंटर पेट्रोलपंप भारत पेट्रोलियम आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या सीएनजी (CNG) पंपचा शुभारंभ सोमवार 15 जून रोजी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे सरव्यवस्थापक सरदार पडवळ यांच्या हस्ते करण्यात आला.


मालवणात सीएनजी वाहनांची संख्या वाढत होती. मात्र याठिकाणी सीएनजी पंप नसल्याने वाहन चालकांना ओरोस अथवा कुडाळ येथे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मालवणातील सीएनजी धारक तसेच रिक्षा व्यावसायिक यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन मालवणात सीएनजी पंप सुरु व्हावा याबाबत मागणी केली होती. सीएनजी पंप ची गरज व त्याबाबत मागणी पाठपुराव्यातून मालवण शहरातील श्रीनिवास ऑटो सेंटर पेट्रोलपंप येथे सीएनजी पंप सुविधा सुरु झाली आहे.

प्रामुख्याने सीएनजी धारक रिक्षा व्यावसायिक, अन्य वाहने, पर्यंटकांची वाहने यांना फायदा होणार आहे. मालवणात सीएनजी पंप सुरु झाल्या बाबत सीएनजी धारक यांच्या वतीने रिक्षा व्यावसायिक निलेश लुडबे व अन्य वाहन चालकांनी आभार व्यक्त केले आहेत.


श्रीनिवास ऑटो सेंटर पेट्रोलपंप येथे सीएनजी पंप शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे उपव्यवस्थापक आकाश शिंदे, दत्तात्रय शिरसाठ, राहुल कुलपे, सहाय्यक व्यवस्थापक दिव्यांशू यांसह श्रीनिवास ऑटो सेंटर पेट्रोलपंप व्यवस्थापक रवी मालवणकर, आनंद वराडकर, मंदार गांवकर, राहुल वीर, तेजस राणे, महादेव चव्हाण, राकेश बगाड, अमित खांदारे, अश्विन गांवकर, रोहन चव्हाण उपस्थित होते. तसेच सीएनजी धारक, रिक्षा व्यावसायिक यांचीही मोठी उपस्थिती यावेळी होती.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom