Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय मालवण येथे शाळा प्रवेशोत्सव

भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय मालवण येथे शाळा प्रवेशोत्सव


मालवण | प्रतिनिधी : आजचे युग हे स्पर्धेचे युग असून या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच प्रशालेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत आपली प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबईचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी मोफत पाठ्यपुस्तक तसेच विध्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आज शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रशालेमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत करतानाच त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच जिलेबीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, आयटीआय मालवणचे प्रिन्सिपल श्री. खेडेकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, आयटीआयचे निदेशक श्री. कोळंबकर, प्रा. पवन बांदेकर, सहाय्यक शिक्षक संदीप अवसरे ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. तर इस्कॉन आयोजित भगवतगीता विषयावरील स्पर्धात्मक परीक्षेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या तन्मय परब या विद्यार्थ्याने बेंगलोर येथील इस्रोला भेट दिल्याने त्याचा तसेच प्रशालेत नव्याने इयत्ता आठवी मध्ये दाखल झालेल्या आणि इस्रो ला भेट देणाऱ्या जुई धारगळकर या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. यावेळी तन्मय परब या विद्यार्थ्यांला मार्गदर्शन करणारे सहाय्यक शिक्षक श्री अवसरे यांचा त्याचप्रमाणे मुख्याध्यापक म्हणून नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या आर. डी. बनसोडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले. सहाय्यक शिक्षक संदीप अवसरे यांनी आभार मानले.

rapan bottom