मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरची द्विवार्षिक निवडणूक २०२६ -२८ मोठ्या उत्साहात पार पडली असून, या निवडणुकीत एकता पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे.
राज्यभरातून एकूण १६८ उमेदवार रिंगणात होते. यातील ऐतिहासिक बाब म्हणजे पहिल्यांदाच तब्बल १४८ उमेदवार बिनविरोध निवडून आले. अध्यक्षपदासाठी मा. रवींद्र माणगावे यांची बिनविरोध निवड झाली असून, सहा उपाध्यक्ष पदेही बिनविरोध जिंकण्यात एकता पॅनेलला यश आले.

कोकणात एकता पॅनेलचा झेंडा
वरिष्ठ उपाध्यक्ष, कोकण विभाग उपाध्यक्ष व सिंधुदुर्गातून गव्हर्निंग कौन्सिल मेंबर पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. यात एकता पॅनेलचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.
1. वरिष्ठ उपाध्यक्ष: श्री. करुणाकरण शेट्टी – मोठ्या मताधिक्याने विजयी
2. कोकण विभाग उपाध्यक्ष: डॉ. संतोष शिवाजी राणे – दणदणीत विजय
सिंधुदुर्गातून गव्हर्निंग कौन्सिलवर एकता पॅनेलचे वर्चस्व
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गव्हर्निंग कौन्सिल मेंबर पदासाठी एकता पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले: श्री. राजन नाईक, श्री. विजय केनवडेकर, ॲड. नकुल पार्सेकर, श्री. मिलिंद प्रभू, श्री. मनोज वालावलकर, श्री. विशाल कामत व श्री. कुणाल वरसकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
जाहीर पाठिंब्यामुळे बळ
एकता पॅनेलला _कुडाळ एमआयडीसी असोसिएशन_ व _सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ_ यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. व्यापारी, उद्योजक व कारागिरांच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याच्या भूमिकेमुळे एकता पॅनेलला मतदारांचा कौल मिळाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
निवडणुकीचे मतदान गुरुवार दि. ११ जून २०२६ रोजी कुडाळ एमआयडीसी असोसिएशन, प्लॉट नं. पी-४१ येथे पार पडली. _"कोकणचा विकास, उद्योजकांच्या हातून"_ या ध्येयाने काम करणाऱ्या एकता पॅनेलच्या विजयामुळे जिल्ह्यातील व्यापारी-उद्योजक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. "कोकणचा विकास, उद्योजकांच्या हातून"

