Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

कुडाळात कीर्तन महोसवाचा शुभारंभ

कुडाळात कीर्तन महोसवाचा शुभारंभ

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे आयोजन

निलेश जोशी | कुडाळ : विजयादशमी पासून श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या कीर्तन महोत्सवाचे उदघाटन १२ ऑक्टोबर रोजी रात्रौ ९ वा. कीर्तन महोत्सवाचे सर्व प्रायोजकाचे हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. सावंत प्रभावळकर कुटुंबियाच्या वतीने श्री. राजू सावंत- प्रभावळकर, आणि विलास राणे, सांगिर्डेवाडी , सदासेन सावंत उपस्थित होते. त्यांचे स्वागत मंडळाचे कार्यकर्ते सुशिल परब, गजा घाटकर व प्रतिक राऊळ यानी पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर ह.भ.प.श्री. लक्ष्मी प्रसाद कुलकर्णी यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर काणेकर यानी केले. तसेच संगीतसाथ कलाकाराचे स्वागतही किशोर काणेकर यानी केले.


त्यानंतर ह.भ.प. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी आणि राजू सावंत प्रभावळकर, सदासेन सावंत यानी आणि विलास राणे यानी ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठलाचे पूजन करून दिप प्रज्वलन करून १६ व्या कीर्तन श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सवाचे उद्‌घाटन केले.


कीर्तनाला हार्मोनियम साथ बाळकृष्ण उर्फ पप्पू नाईक, तबला साथ सिध्देश कुंटे, पखवाजसाथ आबा मेस्त्री यांची पाचही दिवस लाभणार आहे. आजच्या कीर्तन महोत्सवाच्या पहिले कीर्तन ह.भ.प. लक्ष्मी-प्रसाद शंकरराय कुलकर्णी यानी संत जगद्‌गुरु श्री तुकाराम महाराजांचा "क्षणी क्षणी हाची करावा विचार । तरावया पार हा भवबिंधू ॥ हा पूर्वरंगाकरीता अभंग घेऊन सुरुवात केली. तर उत्तररंगामध्ये समर्थभक्त अज्ञाना अज्ञान ही कथा सांगितली. श्री बुवानी अत्यंत रसाळवाणीत उत्तम कीर्तन केले. कीर्तनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. कोजागिरी पौर्णिमेला या कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.

rapan bottom