Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला पल्‍स पोलिओ लसीकरण आणि अतिसार नियंत्रण मोहिमेचा आढावा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला पल्‍स पोलिओ लसीकरण आणि अतिसार नियंत्रण मोहिमेचा आढावा

•२८ जूनपासून पल्स पोलिओ लसीकरणाला सुरूवात

•'शाळा प्रवेशोत्सवा'त पालकांना लसीकरण आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याच्या सूचना

• अतिसार प्रतिबंध मोहीम १ जून ते ३१ जुलै २०२६ पर्यंत

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, ही मोहीम २८ जूनपासून सुरू होणार आहे. तसेच १ जून ते ३१ जुलै २०२६ दरम्यान 'Stop Diarrhoea Campaign' (अतिसार नियंत्रण मोहिम) राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित विभागांचा आढावा घेत मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी आवश्यक सूचना दिल्या. विशेषतः १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून पालकांपर्यंत पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व तसेच अतिसार नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी आवश्यक माहिती पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची जिल्हास्तरीय आढावा बैठक शुक्रवार (दि १२ जून ) रोजी पार पडली. या बैठकीत जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतिक उगारे यांच्यासह शिक्षण, महिला व बालविकास तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, ० ते ०५ वयोगटातील प्रत्येक बालकांपर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मोहिमेदरम्यान एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. यंदा १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा प्रवेशोत्सवात मोठ्या संख्येने पालक शाळांमध्ये उपस्थित राहणार आहेत. या संधीचा उपयोग करून शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पालकांना पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. लसीकरणामुळे मुलांचे पोलिओसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण होते, तसेच निरोगी भविष्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पालकांना पटवून देण्यावर भर द्यावा असेही त्‍यांनी सांगितले. तसेच अतिसार नियंत्रण मोहिमेचे अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर पोहोचविणे हे अंतिम ध्येय आहे. अतिसार असलेल्या सर्व मुलांकरीता ओआरएस आणि झिंक चे वाटप होईल व त्यांच्यापर्यंत पोहोचेल याचे नियोजन करा. अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे समुपदेशन करा असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी लसीकरण केंद्रांची तयारी, आवश्यक मनुष्यबळ, जनजागृती उपक्रम, दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आणि मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. गावपातळीवरील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेऊन व्यापक जनजागृती करण्याचेही नियोजन करण्यात आले असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. तसेच अतिसार नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी नागरिकांना आवाहन केले की, २८ जून रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून मोहिमेला यशस्वी करावे. प्रत्येक बालक सुरक्षित, निरोगी आणि पोलिओमुक्त राहणे हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे त्या म्हणाल्या.

लसीकरण मोहिमेची तयारी

१) ० ते ५ वर्षे वयोगटातील नोंदलेली बालके = २७,८०६ (ग्रामीण - २४,७१६) (शहरी - ३,०९०)

२) एकूण लसीकरण केंद्रे = ९०४ (ग्रामीण - ८६९) (शहरी - ३५)

३) मोबाईल टिम = ८० (ग्रामीण - ७४) (शहरी - ०६)

४) ट्रान्झीट टीम = ४३ (ग्रामीण - ३२) (शहरी - ११)




rapan bottom