'युवा महाराष्ट्र दौरा' ; युवकांना करणार मार्गदर्शन
मालवण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रींकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक 'युवा महाराष्ट्र' दौरा अनुषंगाने 22 ऑक्टोबर रोजी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी कोकण दौरावर येणार आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य युवासेना सचिव राहुल लोंढे व किरण साळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शेकडो युवकांचे युवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे. तसेच नवनियुक्ती पदे दिली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य व कोकण विभाग निरीक्षक राहुल अवघडे यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता, सावंतवाडी सिटी वैश्य भवन आणि सायंकाळी 5 वाजता रत्नागिरी (दक्षिण) स्वयंवर मंगल कार्यालय येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक दिलीप सामंत, जिल्हाप्रमुख श्री हर्षद ढेरे (सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग), जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत व युवतीसेना जिल्हाप्रमुख सौ. सोनाली पाटकर (मालवण - कुडाळ), कु.मेहुल धुमाळे (कणकवली, देवगड, वैभववाडी) आणि जिल्हाप्रमुख युवा सेना सोशल मीडिया हर्षद पारकर आणि जिल्हाप्रमुख केतन शेट्ये रत्नागिरी (दक्षिण) आणि युवासेनेचे इतर पदाधिकारी युवासैनिकांवर आहे.
या "महाराष्ट्र युवा दौऱ्यात" सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व युवा सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

