Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

लुटारू ही ओळख असल्यानेच लोकं दारातून घालवून देतात त्यामुळे फडफड सुरु आहे....

लुटारू ही ओळख असल्यानेच लोकं दारातून घालवून देतात त्यामुळे फडफड सुरु आहे....


गावात स्वतःची लायकी नसली की बाहेरून आणावे लागतात...

संतोष कोदे व भाऊ हडकर यांच्यावर, आचरा भाजपा प्रभारी संतोष गांवकर यांची सडकून टीका

मालवण :
खोट बोल पण रेटून बोल... ही प्रवृत्ती फोफावत असून संतोष कोदे यांच्याकडे पोहचली आहे. त्यांना सांगतो, माझ्या घरात जे सरपंच पद मिळालं ते गावाने बिनविरोध दिलं होतं. परंतु गाव बिनविरोध होण्यासाठी आम्ही दत्ता सामंत यांच्या क्रशरवर गेलो. कारण तिथे तुमच्याच विरोधात महेंद्र मांजरेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. आणि तो उमेदवारी अर्ज सुद्धा दत्ता सामंत यांनीच भरायला लावला होता हे जेव्हा आम्हाला समजलं, त्यामुळे त्याला मागे घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. माझ्या काकीला सरपंच पद देण्यासाठी क्रशवर आम्ही गेलो नव्हतो. आता राहिला दुसरा मुद्दा, ज्या क्रशरवर आम्ही बसलो होतो तो क्रशर कशाप्रकारे उभा झाला याची सुद्धा माहिती माझ्याजवळ आहे. दत्ता सामंतनी या भ्रमात राहू नये की मी म्हणजे जिल्हा. राणे नावाचं फार मोठ वलय आहे त्यामुळे सर्वकाही काही हे त्यांनी लक्षात ठेवावे. सोबतच संतोष कोदे यांनी खोटं बोल पण रेटून बोल हे बंद करावे. कारण जनता सुज्ञ आहे. जनतेला सर्वकाही माहिती आहे. असा जोरदार पलटवार आचरा भाजपा प्रभारी संतोष गांवकर यांनी केला आहे.

चिंदर गावात विकास कामांच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना पदाधिकारी संतोष कोदे, भाऊ हडकर यांनी केलेल्या टिकेचा समाचार भाजपा आचरा प्रभारी संतोष गांवकर यांनी घेतला. त्यांनी संतोष कोदे व भाऊ हडकर यांच्यावर सडकून टीका केली. लुटारू ही ओळख असल्यानेच लोकं दारातून घालवून देतात त्यामुळे फडफड सुरु आहे.... गावात स्वतःची लायकी नसली की बाहेरून आणावे लागतात... असाही टोला संतोष गांवकर यांनी लगावाला.

दिलेल्या प्रेस नोट मध्ये संतोष गांवकर म्हणाले, संतोष कोदे यांच्याबाबत बोलण्यासारखे भरपूर आहे, ज्यांनी देशी दारू पिऊन दुसऱ्याची गाडी रामगड मध्ये ठोकली. आचऱ्यापासून चिंदर पर्यंत अनेक युवकांना दारू मुळे बरबाद केले. आणि स्वतः ज्या ठेकेदारी व्यवसायातून अवैधरिता पैसे करून मोठे झाले त्यांनी स्वतःचे पहिले दिवस आठवावेत. धोंडी चिंदरकर यांनी तुमची ओळख गावाला करून दिली आणि छोटी मोठी ग्रामपंचायतीची कामे दिली मोठ केले. मी जास्त काही बोललो तर शिक्षक घरीण्याची लाज रस्त्यावर येईल. म्हणून कोदे यांना विनंती आहे माझ्या नादी बिलकुल लागू नका.

आता तिसरा मुद्दा भाऊ हडकर... याची तर लायकी नाही. क्षमताही नाही. ज्याच तोंड सकाळी दिसले तर संपूर्ण दिवस खराब होतो म्हणून लोक रस्ता बदलतात. त्या भाऊ हडकरला लोकं सकाळीच भेटायला येतात? असे म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे. खरतर तिसरी चपाती मागितल्यावर घरात मारतात त्याने माझ्यावर बोलावं? आणि कहर म्हणजे बायकांनी मारलं त्याचा गुन्हा दाखल झाला होता त्याचे कारण गावाला माहिती आहे. अरे हा वाळू चोर, आव्हानाची कसली भाषा करतो. दोन दिवसांपूर्वी हा मला आव्हान देऊन ग्रामपंचायत मध्ये पत्रकारांसोबत डिबेट करायला येणार होता. आम्ही पत्रकांसमवेत दोन तास वाट बघितली. मात्र हे बांडगुळ आलं नाही. कारण मला माहिती होतं याची क्षमता याची औकात तेवढी नाही. अरे माऊली मंदिरात राहून ज्यांनी दिपू सुर्वेच्या निवडणुकी वेळी शपता घेतल्या आणि शब्द फिरवले. ते मंदिराची भाषा करतात. अरे त्या देवीला पहिलं तुम्ही मानता का? अशा लायक नसणाऱ्या माणसावर माझी बोलण्याची खरंच इच्छा नाही. पण मला माहिती आहे गावातील लोक आपल्याला वाडी वाडीवर उमेदवार सुद्धा देत नाही. जिल्हाध्यक्ष सारखा माणूस गावात फिरून सुद्धा वाडीत लोक उभ करत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी माझ्यासारख्या माणसावरही चिखल फेक होते. याला कुठेतरी उत्तर द्यावं म्हणून आजही मी उत्तर दिलेले आहे. नाहीतर माझं खरं अशा लाज नसलेल्या लोकांना उत्तर देण्याची मानसिकताच नव्हती. गावातील जनता सुज्ञ आहे. कोणी विकास केला कोण विकास करतं? कोण गावासाठी झटतं याची सर्व जाणीव ग्रामस्थांना आहे. याचे उत्तर जनता मतपेटीतून देणारच आहे. त्यामुळे माझा चिंदर गावच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. आई माऊली रामेश्वरवर विश्वास आहे. आता तर निवडणुकीचे बिगुल वाजलेला आहे. त्यामुळे यापुढे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला जनता देईल.असेही संतोष गावकर यांनी सांगितले.

दुसऱ्याला लुबाडणाऱ्यांनी माझ्या नादी लागू नये

यापूर्वी दोन निवडणुकीत दत्ता सामंत यांच्या नियोजन शून्य नेतृत्वामुळे त्यावेळी आदरणीय दादा आणि निलेशजी राणे साहेबाना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे निवडणूक आणि नियोजन हे समजण्यासाठी आणि रणनीती समजण्यासाठी त्यांना धोंडी चिंदरकर यांच्याकडे ट्रेनिंगला पाठवा. फक्त आता मी लहान तोंडी मोठा घास घेत नाही. परत सांगतो राणे हे नाव न वापरता ग्रामपंचायत निवडणुक लढवून दाखवा बघा सत्ता येते का?त्यामुळे दुसऱ्याला लुबाडणाऱ्यांनी माझ्या नादी लागू नये. असाही टोला संतोष गांवकर यांनी संतोष कोदे, भाऊ हडकर यांना लगावला.

rapan bottom