Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिलेला शब्द पूर्ण केला

आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिलेला शब्द पूर्ण केला


कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर

मालवण |प्रतिनिधी: आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील रंगकर्मी मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मालवण नगरपरिषदेच्या मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे.
गेली अनेकवर्षे मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहाचे काम अपूर्णावस्थेत असून निधी उपलब्ध नसल्यामुळे हे काम अपूर्णच होते, नाट्यरसिकांना व्यासपीठ मिळावे यासाठी आमदार निलेश राणे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नगरविकास विभागांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी पहिल्या टप्यात १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या सोबतच मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह पूर्णपणे नादुरुस्त झाले होते, त्याच्या उभारणीसाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिले होते. या नाट्यगृहालाही पहिल्या टप्यात १० कोटींचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर करण्यात आला असून लवकरच दोन्ही कामाचा शुभारंभ होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. दोन्ही नाट्यगृह अद्ययावत होऊन नाट्यरसिकांच्या सेवेसाठी खुली होतील.

rapan bottom