संतोष गांवकर तुमचा काकीला सरपंचपद मिळावे यासाठी तुम्ही घेतलेली ती भेट विसरलात
तेव्हा तुमचा घरात सरपंच आणि सत्ता 'दत्ता तिथे सत्ता' यांमुळेच आली
शिवसेना आचरा विभागप्रमुख संतोष कोदे यांनी केली पोलखोल
संतोष गांवकर ठकसेन : शिवसेना चिंदर विभागप्रमुख भाऊ हडकर यांची टीका
यापुढे टिकेला उत्तर देणार नाही, चिंदर गावचा विकास आणि जनतेची सेवा हेच आमचे लक्ष राहणार
मालवण : दत्ता तिथे सत्ता हे समीकरण बरोबरच आहे. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात काम करत असताना दत्ता सामंत यांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे. अनेक निवडणुक निकालातून हे सिद्ध झाले आहे. असे असताना बोलबच्चन गिरी करून चिंदर गावात मोठेपणा मिरवणाऱ्या संतोष गांवकर यांनी काकीला सरपंच करण्यासाठी दत्ता सामंत यांच्या शिरवंडे येथील क्रशरवर घेतलेली भेट आठवावी. तेव्हा संतोष कोदे यांसह धोंडी चिंदरकर, शशी नाटेकर, धनंजय नाटेकर ही मंडळी होती. तेव्हा तुमचा घतरात सरपंच आणि सत्ता ही दत्ता तिथे सत्ता मुळे आली. तेव्हाही चिंदर गावचे सरपंच पद निश्चित करण्यात दत्ता सामंत यांचीची भुमिका महत्वाची राहिली. अशी भेट झाली नव्हती असे तुमचे म्हणणे असेल तर संतोष गांवकर तुम्ही आणि धोंडी चिंदरकर यांनी माऊली मंदिरात येऊन सांगावे. असे खुले आव्हान शिवसेना आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे यांनी भाजपा आचरा प्रभारी संतोष गांवकर यांना दिले आहे.
दरम्यान, शिवसेना चिंदर विभाग प्रमुख भाऊ हडकर यांनीही संतोष गांवकर यांच्यावर पुन्हा एकदा टीका करताना प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर टीका करणाऱ्या संतोष गावकर आणि टिलू यांनी आपले आत्मपरिक्षण करावे. ग्रामपंचायत निवडणुकीत विभागातील सदस्य पदाच्या 3 जागीही पराभव असणाऱ्या ठकसेन माणसाला सोबत घेऊन फिरणाऱ्या धोंडी चिंदरकरांना आपले गावातील असेल नसेल ते घालवण्याची वेळ येईल.
ग्रामपंचायत, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदान कमी होते. याला कारण देखील टीलू पिल्लू ची जोडी जबाबदार आहे. असेही भाऊ हडकर यांनी म्हटले आहे.
आचरा गावात विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपा आचरा प्रभारी संतोष गावकर यांनी केलेल्या टीकेचा शिवसेना पदाधिकारी संतोष कोदे व भाऊ हडकर यांनी समाचार घेतला आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रात भाऊ हडकर यांनी म्हटले आहे. चिंदर गावात गोवा बनावटीची विषारी दारू विकणाऱ्या चोर माणसाने आणि चिंदर पंचक्रोशीतील तरुण पिढी बाद करणाऱ्याने, गावातील शेतकऱ्याची गुरे चोरून कत्तल खान्यात विकणाऱ्या माणसाने तसेच वाळू व्यवसायिक कडून जबरदस्तीने कमिशन गोळा करणाऱ्या माणसाने माझ्यावर टीका करू नये. चिंदर गावात एवढ्या कोटीचा बंगला संतोष गावकर यांनी कमिशनवर बांधला असा माझा आरोप असून त्यांनी आपला व्यवसाय जाहीर करावा. मला भाऊशेठ अशी हाक लोक मारतात. मात्र संतोष गावकरना ठकसेन संतोष गावकर अशा प्रकारे हाक कां मारली जाते. माझ्या घरी सकाळी लोक जेसीबी, डंपरसाठी येतात मात्र तुमचा घरी ठकवलेल्या पैसे साठी येतात. याचे उत्तर द्यावे. अशी टीका भाऊ हडकर यांनी केली आहे.
दत्ता तिथे सत्ताच....
संतोष गांवकर यांनी टीका करताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यावरही टीका करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला शिवसेना विभाग प्रमुख संतोष कोदे यांनी उत्तर दिले आहे. दत्ता तिथे सत्ता हे समीकरण बरोबरच आहे. संतोष गांवकर यांनी त्यावेळी काकीला सरपंच करण्यासाठी दत्ता सामंत यांच्या शिरवंडे येथील क्रशरवर घेतलेली भेट आठवावी. तेव्हा संतोष कोदे यांसह धोंडी चिंदरकर, शशी नाटेकर, धनंजय नाटेकर ही मंडळी होती. तेव्हा तुमचा घरात सरपंच आणि सत्ता ही दत्ता तिथे सत्ता यामुळे आली. तेव्हाही दत्ता सामंत यांचीची भुमिका महत्वाची राहिली आणि यापुढेही निवडणकीत राहील. अशी भेट झाली नव्हती असे तुमचे म्हणणे असेल तर संतोष गांवकर तुम्ही आणि धोंडी चिंदरकर यांनी माऊली मंदिरात येऊन सांगावे. असे खुले आव्हान शिवसेना आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे यांनी भाजपा आचरा प्रभारी संतोष गांवकर यांना दिले आहे.
यापुढे कोणतेही उत्तर देणार नाही, चिंदर गावचा विकास हेच आमचे लक्ष
चिंदर गांवचा विकास हेच आमचे लक्ष आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही टिकेला आम्ही उत्तर देणार नाही. गावात अधिक विकासकामे करून जनतेची सेवा करणे हेच आमचे लक्ष राहील. ज्यांना गावात फक्त राजकारण करायचे आहे त्यांनी तेच करावे. आम्ही आमचे नेते खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात विकास आणि जनसेवा हेच लक्ष ठेवून काम करत राहणार. असे संतोष कोदे यांनी स्पष्ट केले.

दत्ता सामंत यांच्या शिरवंडे येथील क्रशरवर त्यावेळी कोण कोण भेटले?
