Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

सत्पुरुषांच्या इहलोकात

सत्पुरुषांच्या इहलोकात


ज्येष्ठ संतचरित्र लेखनकार रविंद्र धामापूरकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली


"कौन सा सवाल लिए कंधे पर, भटक रहा है तू दर-दर;
उसका जवाब दिया खुदा ने खुद तेरे साथ रहकर।"

काही व्यक्ती आयुष्यभर प्रश्नांची उत्तरे शोधत जगतात, तर काही व्यक्ती स्वतःच अनेक प्रश्नांची उत्तरे बनून जातात. संतचरित्रकार, साहित्यिक, शिक्षक आणि अध्यात्माचा सुगंध शब्दांतून उधळणारे रवींद्र धामापूरकर सर हे असेच एक व्यक्तिमत्त्व होते. पुरुषोत्तम मासातील कमला एकादशी आणि त्यातही गुरुवार या दिवशी सरांनी इहलोकाचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांच्या निधनाला केवळ मृत्यू म्हणणे योग्य ठरणार नाही; ती त्यांच्या आयुष्यभराच्या साधनेची, लेखणीच्या तपश्चर्येची आणि भक्तीमय जीवनाची पुण्यतिथी ठरली. मृत्यू अटळ आहे हे शरीरशास्त्र आणि अध्यात्म म्हणून स्विकारले की सरांचे संपूर्ण आयुष्य आणि त्यां निवर्तन ह्यांच्यातील एक जडत्व समजत जाते..

ज्यांचे लहानपण जनयुग किंवा आघाडीच्या दिवाळी अंकावर मोठे झाले आहे , त्या सर्वांना धामापूरकर सरांचा यंदाच्या दिवाळी अंकातील लेख कोणता असेही ही वर्षभर असणारी उत्सुकता असायची.. लक्षात घ्या तो काळ म्हणजे एका वर्षाने वाचायला मिळणारा लेख आणि त्यांची पूर्ती वर्षभर असणारा असायचा.. धामापूरकर सर म्हणजे अलौकिक शब्द अगदी मुक्तहस्ते वापरावा अशा आयुष्याचे धनी होते. प्रसिद्धीपासून दूर असणारे सर आयुष्यभर संतचरित्राच्या बाबतीत मालवणसह संपूर्ण अध्यात्मिक विश्वासाठी चिरंतन लामणदिवा ठरले.

कोकणातील धुरीवाडा, मालवण परिसरात राहून रवींद्र धामापूरकर सरांनी संतचरित्रे, धार्मिक ग्रंथ आणि अध्यात्मिक विषयांवर विपुल लेखन केले. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना त्यांनी शब्दांच्या माध्यमातून समाजालाही संस्कारांचे आणि श्रद्धेचे शिक्षण दिले. संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी आयुष्यभर केले.

धामापूरकर सरांना मी एकदाच भेटलोय.. माझ्या मित्राचे वडिल आणि माझ्या वडिलांचे मित्र या वर्तूळात असणारे सर त्यांच्या निवासस्थानी स्वामींच्या पुजेत असताना मी तासभर बोललोय. त्यांची आता न मिळणारी पुस्तके इथपासून ते संतचरित्र कसे लिहावे इथपासून सगळं.. आज ते घऱावर लावायला सहज स्टिकर मिळतात.. हे स्वामींचे घर आहे, इथे स्वामी राहतात.. पण ही पाटी लावायचा अधिकार फक्त धामापूरकर सरांच्या निवासस्थानी असलेल्या पाटीलाच होता.. घराचे मंदिर बनवताना, ते स्वामींचे घर असले पाहिजे याची जपणूक करणारे सर आणि त्यांचे कुटुंबीय हा सगळा एका उच्च आध्यात्मिक संस्काराचा भाग आहे. आता त्या घरात सर नसतील पण सरांचे स्वामी आणि सरांचा अध्यात्मिक विचार नक्कीच असेल.. सरांनी पावसच्या शांततेवर पुस्तक लिहीलं होतं, पण सरांची स्वामीवास्तू म्हणजे दुसरं पावसच आहे..

रविंद्र धामापूरकर सरांच्या लेखणीत भक्ती होती, विचार होता आणि संस्कृतीच्या जतनाची तळमळ होती. सत्पुरुषांच्या सहवासात, कैवल्याश्रमस्वामी महाराज, विष्णुचैतन्य गणपत महाराज, श्री क्षेत्र पावस दर्शन, महासाध्वी नाटेकर आजी , काका महाराज खानोलकर यांच्यावरील साळगावचे दत्तयोगी , साध्वी हिराताई आंबिये यांच्यावरील कैवल्य हिरा, पद्मनाभ संप्रदायावरील आत्मयोगी सत्पुरुष नामयोगी तुलसीदास महाराज, सूर्य कोटी समप्रभ हे श्रीमत्स्वामी विवेकानंदाचे चरित्र, सूर्योपासना साधना साक्षात्कार,यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी संतपरंपरेचे वैभव जपले. त्यांचे लेखन हे केवळ माहिती देणारे नव्हते, तर वाचकाच्या मनात श्रद्धा जागवणारे होते.

"शब्दब्रह्म" आणि "भावगंध" यांसारख्या ललित लेखसंग्रहांतून त्यांनी कोकणच्या मातीतला सुगंध, ग्रामीण जीवनातील निरागसता, निसर्गाचे सौंदर्य आणि अध्यात्मिक चिंतन यांचे अत्यंत रसाळ चित्रण केले. त्यांच्या लेखांमध्ये गावाकडच्या पहाटेचा नाद ऐकू येतो, मंदिरातील घंटानादाची अनुभूती येते आणि कोकणच्या संस्कृतीचे जिवंत दर्शन घडते.

आज सर आपल्यात नाहीत, पण त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द त्यांची आठवण जिवंत ठेवणार आहे. संतचरित्रे लिहिणारा हा लेखक स्वतःच एका सुंदर चरित्राचा विषय बनून गेला आहे. संतांच्या जीवनातील प्रकाश शब्दांतून दाखवणाऱ्या या साहित्यिकाने स्वतःच्या जीवनातूनही साधेपणा, निष्ठा आणि भक्ती यांचा आदर्श घालून दिला.

पुरुषोत्तम मास, कमला एकादशी आणि गुरुवार या त्रिवेणी संगमावर त्यांनी घेतलेला अखेरचा श्वास हा जणू ईश्वराने आपल्या भक्ताला दिलेला सर्वोच्च आशीर्वादच म्हणावा लागेल. ज्यांनी आयुष्यभर संतांची महती गायली, भक्तीचा संदेश दिला, त्यांचा निरोपही अशाच पुण्यप्रसंगी व्हावा, हा योगायोग नव्हे तर ईश्वरी संकेतच वाटतो.

आज त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करताना मनात एकच भावना दाटून येते, आय़ुष्यभर देव सांगणारा , देव लिहीणारा माणूस तसा अबोलच होता.. देवाच्या पावलांनी आला होता, आणि आज देव बनून देवाच्या वाटेवर गेला..

मालवणच्या समृद्ध संतपंरपरेत रांगोळी महाराज आहेत, ओझरचे ब्रम्हानंद स्वामी आहेत, आमची ओझरची नाटेकर आजी आहे.. नाटेकर आजीचे चरित्र आता तसे मिळणार नाही.. पण धामापूरकर सर नसते तर आज्जी किती मोठ्या होत्या, त्यांचे आयुष्य महासाध्वी ह्या एका शब्दात किती व्यापले असते हे कळलंच नसते, विवेकानंदाच्या चरित्राला सूर्यकोटी समप्रभ नाव देणारे धामापूरकर सर विचारांने किती प्रगल्भ होते हे ही कळलं नसत..

सत्पुरुषांच्या सहवासात हे त्यांनी लिहीलेल एक अप्रतिम पुस्तक आहे, आणि त्यांच्या आठवणीवर जर एखादे पुस्तक लिहायचे असले तर त्याचेही नाव तेच असेल..'सत्पुरुषांच्या सहवासात. रवींद्र धामापूरकर सरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.


- ऋषी श्रीकांत देसाई

rapan bottom