ज्याने लोकांची आंबे कलमे चोरून स्वतःच्या कंपाऊंड मध्ये लावली.... तसेच माती चोर, वाळू चोर म्हणूनही तक्रार नोंद
मालवण : अवैद्य धंद्यांच्या टोळीचे जनक भाऊ हडकर आहे. समुद्राची माती, वाळू चोरून विकली. याची तक्रार मालवण तहसील कार्यालय मध्ये नावानिशी आहे. तसेच लोकांची आंबे कलमे चोरून स्वतःच्या कंपाउंड मध्ये लावली. याला गेल्या में महिन्यात वाडीतील लोकांनी गावच्या कमिटीवरून काढून टाकलं का तर ३ वर्ष मंदिर कमिटीला हिशोब दिला नाही. भाऊ हडकर हा चोरच आहे. अशी बोचरी टीका भाजपा आचरा प्रभारी संतोष गांवकर यांनी शिवसेना चिंदर विभाग प्रमुख भाऊ हडकर यांच्यावर केली आहे.
याने माझ्यावर बोलू नये. माझं खानदान राजकारण प्लस समाजकरण करत आहे. माझे वडील आणि काकी यांनी चिंदर गावचे नेतृत्व केलं आहे. माझ्या घराण्याला इतिहास आहे. पण ज्याला भूगोल शब्द लिहिता येणार नाही. नैतिकता शब्द वाचता येत नाही त्याने माझ्यावर बोलावे? हे हास्यास्पद आहे. असाही टोला आचरा भाजपा प्रभारी संतोष गांवकर यांनी लगावला.
चिंदर गावात विकासकामांवरून आरोप प्रत्यरोप सुरूच आहेत. यात संतोष गांवकर यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना भाऊ हडकर यांनी अवैध व्यवसाय करणारे संतोष गावकर यांना नैतिक अधिकार नाही. वाडीच्या विकासात तरी योगदान आहे का? अशी टीका केली होती. या टिकेला संतोष गांवकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले असून भाऊ हडकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.
संतोष गांवकर यांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे. ज्याने लोकांची आंबे कलमे चोरून स्वतःच्या कंपाऊंड मध्ये लावली त्याने अवैध धंद्यावर बोलावे या सारखा दुसरा जोक्स नाही. अवैद्य धंद्यांच्या टोळीचे जनक भाऊ हडकर समुद्राची वाळू ज्यांनी चोरून विकली. लोकांचे आंबे कलमे चोरून स्वतःच्या कंपाउंड मध्ये लावली. देवदेवसकीचा बादशहा याने अवैध धंद्यावर बोलावं?
भाऊ हडकर यांनी माझे कुठले अवैध धंदे आहेत ते जाहीर करावे पण हा वाळू चोर, मातीचोर आहे याची तक्रार मालवण तहसीलदार मधे नावानिशी आहे. याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. पत्रकारांनी तहसीलदार मालवण यांच्याकडून माहिती घ्यावी आणि जाहीर करावे. ज्याला गेल्या में महिन्यात वाडीतील लोकांनी गावच्या कमिटीवरून काढून टाकलं का तर ३ वर्ष मंदिर कमिटीला हिशोब दिला नाही. त्याने माझ्यावर बोलावे? माझं खानदान राजकारण प्लस समाज करणं करत आहे. माझे वडील आणि काकी यांनी चिंदर गावचा नेतृत्व केलं आहे. माझ्या घराण्याला इतिहास आहे. पण ज्याला भूगोल शब्द लिहिता येणार नाही नैतिकता वाचता येत नाही त्याने माझ्यावर बोलावे? खरतर भाऊ हडकर चोरच आहे. असेही गांवकर म्हणाले.
चिंदर गावात संतोष कोदे यांनी अनेक विकासकामे केली असे भाऊ हडकर सांगत असतील तर विकास करायला संतोष कोदे १० वर्ष मु.पो. कणकवली गावात. कोण मेलं की गेलं याच सोयर सुतक त्यांना माहित नसत. तरीही कोदे ना काही प्रश्न आहेत. पाणलोटच्या तळ्या बंधारे कुठे कोणी चोरून नेले?
*राहिला प्रश्न विकास कामांचा तर मान. रविंद्र चव्हाण, मान. नारायणराव राणे (दादा) पालकमंत्री नितेशजी राणे आणि आमदार निलेशजी राणे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष मान. प्रभाकर सावंत या सगळ्या नेत्यांचं सहकार्य आहे. या सगळ्या आमच्या नेते मंडळी या मुळे आणि मान. धोंडी चिंदरकर यांच्याच पाठपुराव्यामुळे चिंदर गावात विकासकामे झाली आहेत. हे गावं सुद्धा नाकारत नाही.*
कोणा बाजार बूनगॅमुळे आमच्या गावचा विकास नाही. पण दत्ता तिथे सत्ता हे गणित कुणीतरी चुकीच मांडले. उलट सत्ता तिथे दत्ता असे असायला हवे. एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला १४ दिवस चिंदर गावात येऊन स्टंटबाजी करावी लागते हा तुमच्या अध्यक्षांचा नैतिक पराभवच आहे. काही चाटूगिरी करणारे प्रत्येक विभागात 2/3 अशासाठी ठेवले आहेत की काही नसले तरी साहेबांनी हे केलं साहेबांनी ते केलं हे वाजवत राहायचं. खरतर राणे आडनावाचा जर वापर केला नाही तर तुमच्या अध्यक्षाला एसटी ड्रायवर सुद्धा गाडी थांबवेल यात शंका आहे? माझा गाव निर्धोक निर्धास्त आणि अरे ला कारे म्हणणारा आहे. गावा गावात जाऊन तुमचे जिल्हाअध्यक्ष युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्यांना परमेश्वर सुबुद्धी देवोत. पण आमच्या अंगावर आलं तर जशास तसं उत्तर पुढील काळात दिलं जाईल एवढ नक्की. असे संतोष गावकर यांनी भाऊ हडकर यांना सुनावले आहे.

अवैध धंद्यांच्या टोळीचे जनक भाऊ हडकर : भाजपा आचरा प्रभारी संतोष गांवकर यांची बोचरी टीका
