Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

सुधीर गोसावी यांना तबला विशारद पदवी प्राप्त

सुधीर गोसावी यांना तबला विशारद पदवी प्राप्त


अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या विशारद परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण

मंगेश नलावडे | मालवण : मालवण मधील तबला वादक श्री. सुधीर मच्छिन्द्रनाथ गोसावी यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या विशारद परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होत 'तबला विशारद' ही पदवी प्राप्त केली आहे.
मूळ काळसे गावचे सुपुत्र असलेले सुधीर गोसावी हे मालवण मधील टोपीवाला हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून सेवेत आहेत. प्रथम पखवाज वादक असलेल्या सुधीर गोसावी यांनी कॉलेज जीवनापासून तबला वादनाचे शिक्षण घेतले. मिलिंद हडकर व अरुण केळूसकर यांच्याकडे त्यांनी तबला वादनाचे धडे गिरवले. तसेच मंगेश कदम यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. एक उत्कृष्ट तबला वादक म्हणून ओळख असलेल्या श्री. गोसावी यांनी मालवणसह जिल्ह्याच्या संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात गोसावी यांनी आपल्या तबला वादनाने वेगळी छाप सोडली आहे. तबला विशारद परीक्षेत श्री. गोसावी यांनी ६३१ गुणांसह प्रथम श्रेणी मिळवीत तबला विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. श्री. गोसावी यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom