Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवण शहरात 'नागरी आशा' नियुक्त व्हाव्यात

मालवण शहरात 'नागरी आशा' नियुक्त व्हाव्यात

भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडे जनतेतून मागणी

जनतेपर्यत आरोग्य उपक्रम अधिक परिणाम कारकपणे पोहचवण्यासाठी नागरी आशा महत्वपूर्ण ठरतील

मालवण | प्रतिनिधी : जनतेला अधिकाधिक दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र व राज्य सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. अनेक आरोग्य योजना आणल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून सेवा दिल्या जात असतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी भागात आरोग्य सेवेत राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन (एनयुएचएएम)
नागरी आशा सेविका (उषा) सेविका असाव्यात ही जनतेची मागणी शासनाकडे मांडली जाईल. हा धोरणत्मक निर्णय असून ग्रामीण भागात एक हजार लोकसंख्येला एक आरोग्य सेविका कार्यरत आहेत त्या प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरी भागासाठी प्राधान्याने मालवण साठी नागरी आशा (उषा) नियुक्ती होण्यासाठी आपण प्रयत्नाशील राहू. जनतेला अधिकाधिक जर्जेदार सेवा मिळावी, निरोगी आरोग्य राहावे. यासाठी ज्या सेवा सुविधा आवश्यक आहेत त्या शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुराव्यासह प्रयत्नाशील असल्याचे भाजपा नेते निलेश राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी भागात जनतेपर्यत आरोग्य सेवा, आरोग्य उपक्रम अधिक परिणाम कारकपणे पोहचवण्यासाठी मोठया मोठया शहरांच्या धर्तीवर (एनयुएचएम) चे निकष सिंधुदुर्ग डोंगरी भागासाठी शिथिल करून उषा सेविका नियुक्त झाल्यास अधिक फायदा होणार आहे. ग्रामीण भागात जश्या आशा सेविका कार्यरत असतात तश्याच उषा सेविका आरोग्य सेवेत मालवण शहर तसेच जिल्ह्यातील शहरी भागासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन (एनयुएचएएम) लागू करून आरोग्य सेवेत उषा सेविका अशी जनतेतुन असलेली मागणी जनतेच्या माध्यमातून भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडे आली. त्याला निलेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कट्टा मालवण येथे आरोग्य सेवेचा आढावा घेत असताना जनतेतून अश्या स्वरूपात मागणी समोर आली आहे.

पेंडूर कट्टा मालवण ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य सेवा सुविधा यांचा निलेश राणे यांनी आढावा घेतला. भेटी दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली. सेवेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी तत्पर असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

  • वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊ

मालवण तालुक्यातील आरोग्य सेवा, उषा सेविका तसेच अन्य काही आरोग्य विषयक मागण्या बाबत वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊ. शासनदरबारीं याबाबत मागणी करून साकारत्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्नशील राहू. अशी ग्वाही निलेश राणे यांनी आरोग्य अधिकारी यांना दिली.

ruchira top