Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

चिंदर गावासाठी संतोष कोदे यांनी काय केले हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार अवैध व्यवसाय करणाऱ्या संतोष गांवकर यांना नाहीच

चिंदर गावासाठी संतोष कोदे यांनी काय केले हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार अवैध व्यवसाय करणाऱ्या संतोष गांवकर यांना नाहीच


शिवसेना चिंदर विभाग प्रमुख भाऊ हडकर यांनी सुनावले

संतोष गांवकर तुमचे तुमच्या वाडीच्या विकासात तरी योगदान आहे का?

मालवण : आमचे नेते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून कोट्यावधी रुपयांयी विकासकामे संतोष कोदे यांनी गेल्या अनेक वर्षात चिंदर गावात पुर्ण केली. चिंदर गावचा सर्वांगीण विकास हेच धेय्य ठेवून संतोष कोदे यांनी गांव विकासात नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे. असे असताना संतोष कोदे यांनी काय केले हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार अवैध व्यवसाय करणाऱ्या संतोष गांवकर यांना नाहीच. अन्यथा जश्यास तसें प्रत्युत्तर 'पोलखोल' करून दिले जाईल. असा इशारा शिवसेना चिंदर विभाग प्रमुख भाऊ हडकर यांनी दिला आहे.

संतोष कोदे यांचे चिंदर गांव विकासात भरीव योगदान असताना संतोष गांवकर तुमचे तुमच्या वाडीच्या विकासात तरी योगदान आहे का? असा सवाल भाऊ हडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच कुंभारवाडी स्मशानभूमी रस्ता शासकीय योजनेतून मंजूर यांचे कागद फिरवणारे संतोष गांवकर आपले अर्धवट ज्ञान जगजाहीर करतं आहेत. कारण शासकीय योजनेतून हा 150 मिटर रस्ता मंजूर होता. मात्र प्रत्यक्षात 300 मिटर वाढीव रस्ता आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांनी स्व निधीतून केला. यातही संतोष कोदे यांचा पाठपुरावा महत्वाचा असल्याचे हडकर यांनी सांगितले.

घरात 23 वर्षे सत्ता असताना संतोष कोदे तुम्ही चिंदर गावासाठी काय केले? असा सवाल भाजपा आचरा प्रभारी संतोष गांवकर यांनी केला होता. याला भाऊ हडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चिंदर गावात विकासकामावरून आरोप प्रत्यारोप सुरु असून शिवसेना पदाधिकारी भाऊ हडकर यांनी भाजपा पदाधिकारी संतोष गांवकर यांच्यावर टीका केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रात भाऊ हडकर यांनी संतोष कोदे यांच्या पाठपुराव्यातून चिंदर गावात झालेल्या प्रमुख विकासकामांची यादी जाहिर केली आहे. यात चिंदर तलाव गाळ काढणे पहिल्या टप्प्यात निधी (30 लाख), चिंदर पालकरवाडी, साटमवाडी लब्देवाडी रस्ता (ग्राम सडक), चिंदर वड ते चर्च जाणारा रस्ता, चिंदर कांबळी दुकान रस्ता, भारत निर्माण योजना 9 विहीर बांधकाम, चिंदर भगवती मंदिर येथे संरक्षक भिंत बांधणे, चिंदर रवळनाथ मंदिर येथे संरक्षक भिंत बांधणे, चिंदर रामेश्वर मंदिर येथे सभामंडप बांधणे, चिंदर सडेवाडी ब्राह्मणदेव मंदिर रस्ता, चिंदर भटवाडी थोरत आंबा बाग ते गावडे घर जाणारा रस्ता, चिंदर लब्देवाडी मारुती मंदिर रस्ता यांसह अनेक विकासकामे आमचे नेते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून संतोष कोदे यांनी पुर्ण केली आहेत. शासनाच्या माध्यमातून विकासकामे होत असताना प्रसंगी जनतेची गरज ओळखून स्व निधीतून अनेक कामे प्राधान्याने करण्यात आली. कारण जनतेची सेवा आणि गावचा विकास हेच आमचे लक्ष आहे. त्यानुसार संतोष कोदे हे वरिष्ठ नेते मंडळी यांच्या माध्यमातून सातत्याने काम करतं असतात.

संतोष कोदे यांनी गावात केलेल्या कामांची यादी मोठी आणि यापुढेही वाढत जाणार आहे. विकासकामांच्या कागदपत्रांचा एक मोठा गठ्ठा तयार होईल तो गठ्ठा आम्ही तुम्हाला भेट म्हणून देऊ. खर्च झालेला निधी, कामांची लांबी रुंदी यांसह सर्वच माहिती त्या गठ्ठ्यात तुम्हाला मिळेल. संतोष गांवकर तुम्ही आणि तुमचे सहकारी वाचत बसा आणि चिंतन करा. तूर्तास एवढेच पुरे आहे. तुम्हाला ऐकायचेच असेल तर खूप काही बोलण्यासारखे आहे. टप्या टप्प्याने सर्वच गोष्टी सांगू.

हे सर्व वास्तव आम्ही मांडल्या नंतर तुम्ही जास्तीत जास्त आमच्यावर टीका कराल. मात्र आम्ही मांडलेले वास्तव सत्य आहे आणि सत्य राहील. तुम्ही कितीही खोटे बोला पण जनता तुम्हाला सिरीयसली घेत नाही आणि घेणार नाही. असे भाऊ हडकर यांनी सांगितले.

rapan bottom