Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

मालवणात १३ रोजी मच्छिमारांसाठी NFDP नोंदणीची विशेष मोफत सुविधा

मालवणात १३ रोजी मच्छिमारांसाठी NFDP नोंदणीची विशेष मोफत सुविधा


समुद्ररक्षक संमेलनात आयोजन


मालवण | प्रतिनिधी: बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, युथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण नगरपरिषद, नीलक्रांती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ जून रोजी सकाळी ९. ३० ते दुपारी १. ३० या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे होणाऱ्या समुद्ररक्षक संमेलनामध्ये National Fisheries Digital Platform (NFDP) वर नोंदणीची विशेष मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून मच्छीमार, गरकडी, पागली, मासे विक्रेते, खुबे अथवा कालवे काढणारे, मत्स्यशेती करणारे तसेच मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NFDP या पोर्टलवर नोंदणी केल्याने मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध शासकीय योजना, अनुदाने, प्रशिक्षण, डिजिटल सेवा, माहिती सुविधा आणि इतर लाभ योजनांचा लाभ मिळविणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मत्स्य व्यवसाय संबंधित विमा योजनेसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे. National Fisheries Digital Platform (NFDP) तसेच मत्स्य व्यवसाय संबंधित विमा योजनेच्या नोंदणीसाठी इच्छुकांनी आपला मोबाईल नंबर, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी, अधिक माहितीसाठी ९४२२९६७९६४ / ९७६९६७९५३२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

rapan bottom