चिंदर गावात स्व निधीतून विकासकामे केली सांगता त्यापैकी तुमच्याच वाडीतील शासकीय निधीतून मंजूर कामाचा पुरावा देतो
आता तुमच्या जिल्हाध्यक्ष यांना राजीनामा द्यायलाच लावा
मालवण : संतोष कोदे तुम्ही यादी देऊन जाहिर करता की चिंदर गावातील 16 कामे केली. मात्र त्यातील तुमच्याच वाडीतील कुंभारवाडी स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे हे काम 4 लाख शासकीय निधीतून मंजूर झाले. त्याचा पुरावाही सोबत जोडत आहे. आता तुमच्या जिल्हा अध्यक्ष यांना राजीनामा द्यायलाच लावा. अशी भुमिका भाजपा आचरा प्रभारी अध्यक्ष संतोष गांवकर यांनी मांडली आहे.

चिंदर गावात विकासकामावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता भाजपा पदाधिकारी संतोष गांवकर यांनी शिवसेना विभाग प्रमुख संतोष कोदे यांच्यावर टीका केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रात गावकर यांनी म्हटले आहे, कोदे तुम्ही माझे माजे खूप जवळचे मित्र आहात पण वास्तवापासून भरकटत जाता म्हणून हे उत्तर अपेक्षित आहे. कोदे तुमच्या घरात 23 वर्ष सत्ता आहे. तुम्ही सरपंच, उपसरपंच, तुमची पत्नी जिल्हा परिषद सदस्य, तुमची भावजय सरपंच एवढी सगळी पदे तुमच्याच घरात गावाने दिली. मग तुम्ही काय करत होता? की गावात आता कामे करायला तुम्हांला आताच वेळ मिळाला. तुम्ही ज्या वाडीत राहता त्या वाडीतील स्मशान भूमीच्या कामाची टेंडर नोटीस पुरावा म्हणून टाकतो कारण स्वानिधीतून तुम्ही काम केल्याची यादी दिली म्हणून.
प्रश्न राहिला दीपक सुर्वे यांच्यावर तुम्ही केलेल्या टिकेचा. तुम्हाला सांगतो दिपक सुर्वे हे हे कष्टाळू आणि समाज बांधिलकीचे पाईक आहेत. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी वाडी वस्तीवर जावून काम केले. पीपीइ किट घालून धोंडी चिंदरकर आणि टीम यांनी त्यावेळीही काम केले. रुग्णांचे अंत्यसंस्कार केले. गावात कितीतरी कामे केली पण आम्ही त्याच प्रदर्शन नाही. करण जनतेची सेवा हे आमचे कर्तव्य आहे.
फक्त योग्यवेळी योग्य उत्तर द्यायचं हे आमच्या नेत्यानी आम्हाला शिकवलं आहे. आणि कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याची परंपरा ही आहे.
दिपक सुर्वे यांच्यावर टीका करताना ज्या रस्त्या विषय तुम्ही लिहिलात्या त्या रस्त्याला लागून त्याचे घर आहे. रस्ता तेरईवाडी पर्यंत जातो याची सुद्धा आपल्याला जाण नाही यासारखे दुर्दैव नाही. राहिला प्रश्न विकास कामांचा तर तुमचे नेते इतर गावात जाऊन बोंब मारतात की अख्या तालुक्याचा निधी धोंडी चिंदरकर पळवितात आणि तुम्ही तेव्हा आचरे गावात टाळ्या वाजवत होता.
असो जास्त काही बोलत नाही. शासकीय योजनेतून काम मंजूर हा पुरावा सादर केलेला आहे. तेव्हा राजीनामा न चुकता मागून घ्या. राहिला तुम्ही केलेल्या टिकेतील कारनाम्या बाबत तर जेवढे असतील तेवढे सगळे कारनामे उघड करा आणि पुढची कुंडली पण ऐकण्याची तयारी ठेवा. तूर्तास एवढेच. अशी टीका संतोष गांवकर यांनी संतोष कोदे यांच्यावर केली आहे.

