Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

जर माझ्या चिंदर गावात दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून 14 विकास कामे केली असतील तर मी माझ्या पंचायत समिती गट नेता पदाचा राजीनामा द्यायला तयार...

जर माझ्या चिंदर गावात दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून 14 विकास कामे केली असतील तर मी माझ्या पंचायत समिती गट नेता पदाचा राजीनामा द्यायला तयार...


अन्यथा दत्ता सामंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दयावा

चिंदर पंचायत समिती सदस्य तथा मालवण पंचायत समिती भाजपा गटनेते दिपक सुर्वे यांचे आव्हान


मालवण | प्रतिनिधी : जर माझ्या चिंदर गावात दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून 14 विकास कामे केली असतील तर मी माझ्या पंचायत समिती गटनेता पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. अन्याय दत्ता सामंत यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. असे खुले आव्हान चिंदर पंचायत समिती सदस्य तथा मालवण पंचायत समिती भाजपा गटनेते दिपक सुर्वे यांनी दिले आहे.

दिपक सुर्वे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे भुमिका मांडली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. खरंतर खोट बोल पण रेटून बोल ही आतापर्यंतची दत्ता सामंत यांची राजकीय नीतीच राहिली आहे. आता चिंदर गावची निवडणूक जवळ आली आहे म्हणून त्यांना आणि त्यांच्या सहकारी यांना चिंदर गावं दिसला. यापूर्वी कधी का नाही दिसला? लोकांना सांगायचं एडव्हांस रस्ते मारतो आणि आणि नंतर आमदार खासदार निधी मिळवायचा हे त्यांचे नेहमीचे काम आहे. चिंदर गाव हे भौगोलिक दृष्ट्या मालवण तालुक्यातील सर्वात मोठं गावं आहे त्यात काही पाणंद राहिल्या त्यातले २,३ पाणंद काम केले असेल. बाकी ठेकेदारी घेतलेलेच निकृष्ट कामे परत मारायला भाग पाडली. आता खर्च केलेले पैसे हे आमच्या गावातील निकृष्ट कामातून उरलेल्या पैशातूनच असतील. असे सांगत दिपक सुर्वे म्हणाले, तूर्तास एवढेच सांगतो. बाकी आवश्यकता भासेल तेव्हा अधिक सांगेन असे दिपक सुर्वे यांनी सांगितले.

rapan bottom