Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

मालवणात प्रतिबंधित प्लास्टिक साठा जप्त

मालवणात प्रतिबंधित प्लास्टिक साठा जप्त

17 जणांवर कारवाई

150 किलो प्लास्टिक साठा जप्त


मालवण | प्रतिनिधी : मालवण पालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या वतीने शहरात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम राबवण्यात आली. सोमवार पेठेतील आठवडा बाजारा दरम्यान आरोग्य पथकाने सोमवार पेठ आणि देऊळवाडा येथील दुकानांवर अचानक छापे टाकले. या कारवाईत 17 जणांवर कारवाई करून तब्बल १५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. संबंधित व्यापाऱ्यांवर ६ हजार ३०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर होत असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार आठवडा बाजाराच्या दिवशी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे बंदी असलेल्या प्लास्टिकचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पालिकेच्या या धडक कारवाईत स्वच्छता निरीक्षक संजय पवार, स्वच्छता लिपिक मंदार केळुसकर, मुकादम आनंद वळंजू, विजतांत्री सुनिलकुमार कदम यासोबतच पालिकेचे इतर सफाई कर्मचारीही या मोहिमेत सामील झाले होते.
पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा, अन्यथा यापुढेही अशीच तीव्र दंडात्मक कारवाई सुरू राहील, असा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.


फोटो : (अमित खोत, मालवण)

rapan bottom