Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

आमदार वैभव नाईक यांनी हुमरमळा-वालावल येथील निराधार कुटुंबाला केली मदत

आमदार वैभव नाईक यांनी हुमरमळा-वालावल येथील निराधार कुटुंबाला केली मदत

अतुल बंगे यांनीसुद्धा शासकीय मदतीसाठी केला पाठपुरावा

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा (वालावल) गावातील निराधार कुटुबाला आमदार वैभव नाईक यांनी आर्थिक मदत केलीच पण त्याच बरोबर दरमहा तीन हजार शासकीय मदत सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला.


हुमरमळा (वालावल) गावातील शोभा हळदणकर ही शाळेतील स्वयंपाक करुन आपला उदरनिर्वाह करीत असताना अचानक पॅरॅलीसीसने एक बाजु पुर्ण निकामी झाली. गेले कित्येक दिवस त्या अंथरुणाला खिळून आहेत. तिचे पती वयोवृद्ध असल्याने त्यांनाही अतुल बंगे यांच्या प्रयत्नातून शासकीय मदत सुरू झाली. तसेच आजारी असलेली शोभा हळदणकर हीलाही संजय गांधी निराधार योजना सुरू करुन दरमहा शासकीय मदत सुरु करुन एका कुटुंबाला दरमहीना तीन हजार मिळतील असे प्रयत्न माजी सरपंच सौ अर्चना बंगे यांनी केले.

अशातच या निराधार कुटुंबाची कल्पना सरपंच अमृत देसाई, ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी कद्रेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे परिस्थिती सांगुन काही मदतीची मागणी केली होती. त्यानुसार आम. वैभव नाईक यांनी आज वैयक्तिक रोख स्वरूपात मदत माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, माजी सरपंच सौ अर्चना बंगे, हेमंत कद्रेकर, गुरु परकर, दादा परकर यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावेळी महादेव हळदणकर व शोभा हळदणकर या दांपत्याने आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.

rapan bottom