Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू होण्यासाठी सकारात्मक पावले; मंत्री नितेश राणे यांची Fly91 कंपनीसोबत महत्त्वपूर्ण चर्चा

नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू होण्यासाठी सकारात्मक पावले; मंत्री नितेश राणे यांची Fly91 कंपनीसोबत महत्त्वपूर्ण चर्चा


गणेशोत्सवात कोकणवासीयांची गैरसोय टळणार; नवी मुंबई–चिपी मार्गावर वाढीव उड्डाणांची तयारी


मुंबई : कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई-चिपी विमानसेवा स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरू करण्याबाबत तसेच आगामी गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्था करण्यासंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.



यावेळी Fly91 कंपनीचे सीईओ श्री.मनोज चाको यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नवी मुंबई–चिपी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. या सेवेच्या प्रारंभासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.



तसेच, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अतिरिक्त उड्डाणांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. यामुळे कोकणवासीयांसह पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

नवी मुंबई–चिपी विमानसेवा सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणाचा देशातील प्रमुख शहरांशी हवाई संपर्क अधिक मजबूत होईल. याचा पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असून कोकणाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

rapan bottom