Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

"मावळे कधी जागे होणार?" मालवण येथे जनजागृती रॅली...

"मावळे कधी जागे होणार?" मालवण येथे जनजागृती रॅली...

राहुल जाधव | मालवण : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त युथ बिट्स फॉर क्लायमेट, वनशक्ती व सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र यांच्या तर्फे मालवण मध्ये "मावळे कधी जागे होणार?" जनजागृती रॅली काढण्यात आली. मालवण बस स्थानक ते फोकांडा पिंपळ असा या रॅली चा मार्ग होता.


महाराजांचे झाडांविषयी प्रेम, पर्यावरण जपण्याविषयी आपुलकी व महाराज्यांच्या स्वराज्यात स्त्रियांना असलेला आदर व त्यांना भेटणारे संरक्षण या दोन विषयांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी या रॅली चे आयोजन करण्यात आले होते.


या रॅली मध्ये महाराज्यांच्या काळातील सुरक्षित स्त्री आणि आजच्या जगातील असुरक्षित स्त्री या दोन्ही विरोधाभास दाखवणाऱ्या गोष्टी प्रखरपणे मांडण्यात आल्या. आताच्या काळातील मावळ्यांनी जागे होऊन महाराजांसारखी निसर्ग व स्त्रियांची काळजी घ्यावी, त्यांचा सन्मान करावा आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापित करावे असे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमात मेगल डिसोझा (यूथ बिट्स फॉर क्लायमेट, इकॉमेट्स अध्यक्षा), यथार्थ खावणेकर ( वनशक्ती project officer), ऐश्र्वर्य मांजरेकर (वसुंधरा जनकल्याण फाउंडेशन अध्यक्ष), अमरीश मिस्री (जिल्हा समन्वय अधिकारी माविम सिंधुदुर्ग), शैलेश सावंत (उपजीविका सल्लागार सिंधुकन्या CMRP), रिया घाडी (सिंधुकन्या CMRP अध्यक्ष), त्यांचा स्टाफ , इतर युवक व मालवणवासीय उपस्थित होते.

rapan bottom