Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात हिंदी दिवस संपन्न

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात हिंदी दिवस संपन्न

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे महाविद्यालयातील हिंदी विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र वैभववाडी शाखेच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस संपन्न झाला. हिंदी विभागाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बँक प्रबंधक मा.जयदेव कुमार व स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी जयदेव कुमार यांनी हिंदी भाषेचे महत्त्व आणि जीवनामध्ये करिअर संदर्भात कशा पद्धतीने सतर्क राहिले पाहिजे व स्पर्धेच्या युगामध्ये कसे टिकून राहिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मा. सज्जनकाका रावराणे यांनी हिंदी दिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करत आज दिशाहीन होणाऱ्या तरुणांनी आपल्या जीवनाविषयी सकारात्मक विचार केला पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक फिजा उमर काझी (आचरा महाविद्यालय), द्वितीय क्रमांक तुषार पार्टे (वैभववाडी महाविद्यालय), तृतीय क्रमांक प्रीती चव्हाण (तळेरे महाविद्यालय) यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


याप्रसंगी व्यासपीठावर बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रबंधक मा.जयदेव कुमार, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था स्थानिक समितीचे अध्यक्ष मा. सज्जनकाका रावराणे, डॉ एन. व्ही. गवळी, IQAC समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट, हिंदी विभाग प्रमुख प्रा.ए. एम. कांबळे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए. एम. कांबळे यांनी केले, तर आभार आणि निवेदन प्रा.एन. ए. कारेकर यांनी केले.

ruchira top