सिंधुदुर्ग : शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गनगरी -ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा दुर्गराज रायगडावर संपन्न झाला. शिवरायांनी 'छत्रपती' हे पद धारण केले. या दिवसाचे स्मरण करत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला.याप्रसंगी जिल्हापरिषद सिइओ रविंद्र खेबुडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हापरिषद उपाध्यक्ष दादा साईल,रणजित देसाई, शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ,वित्त व बांधकाम सभापती संतोष सटविलकर,अनुराधा नारकर,रुहीता तांबे,सुप्रिया वालावलकर,भाई सावंत, अमित भोगले, दिनेश जैतापकर, शिवप्रेमी, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

