Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

दांडी येथील परस्पर विरोधी गटातील मारहाण प्रकरणी संशयितांना मे. अति. सत्र न्यायाधीश ओरोस यांचे कोर्टात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

दांडी येथील परस्पर विरोधी गटातील मारहाण प्रकरणी संशयितांना मे. अति. सत्र  न्यायाधीश ओरोस यांचे कोर्टात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीतांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, यतिश खानोलकर, अंबरीष गावडे व मेधा परब यांनी यांनी काम पाहिले

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील दांडी किनार्‍यावर पूर्व वैमनस्यातून झालेल्या मारहाणीतील विरुद्ध गटाच्या जखमी नितीन द्वारकानाथ तोडणकर (वय 50), युवराज नितीन तोडणकर (वय 22), भावेश निशाकांत तोडणकर (वय 22), वरद निशाकांत तोडणकर (वय 22), नेहा निशाकांत तोडणकर (वय 45) सर्व राहणार दांडी तालुका मालवण यांना मे. अति. सत्र न्यायाधीश ओरोस-सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. संशयीतांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, यतिश खानोलकर, अंबरीष गावडे व मेधा परब यांनी यांनी काम पाहिले.

मालवण दांडी येथील दोन गटांमधील वादातून समुद्रकिनाऱ्यावर भांडण झाले. त्यात नितीन तोडणकर व राजन कांदळगावकर यांना सुजल संतोष केळुसकर, संतोष केळुसकर व सुहास कोयंडे यांना बियरच्या बाटलीने व दांडे व लोखंडी रॉडच्या साह्याने मारहाण केल्याची व तेथे सोडविण्यास आलेल्या महिलांशी लज्जास्पद वर्तन केल्याची तक्रार दि. 16 जानेवारी 2026 रोजी युवराज तोडणकर याने मालवण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर रात्रौ उशीरा सुजल केळुसकर याने देखील त्याला व त्याच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची व महिलांशी लज्जास्पद वर्तन केल्याची तक्रार संशयीतांविरूद्ध मालवण पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून नितीन तोडणकर वगैरे 5 यांचेविरुद्ध भारतीय न्याय्य संहिता कलम 118(1), 115(2), 189(2) (4), 190, 191(2), 351(2), 324(2), 37(3), 135, 75(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी नितीन तोडणकर व राजन कुमठेकर हे झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल होते.

त्यानंतर संशयीतांतर्फे मे. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. अति. सत्र न्यायाधीश ओरोस याचे न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी रक्कम रु. 50,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला.

rapan bottom