निलेश जोशी | कुडाळ : देशावर अतोनात प्रेम करणारा सच्चा देशभक्त, हिंदुस्थानातील उद्योगधंद्याचे भीष्म पितामह रतनजी टाटा यांचे बुधवार दिनांक ०९ऑक्टोबर रोजी देहावसन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कुडाळवासियांची आदरांजली सभा रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा येथे आयोजित केली आहे. तरी रतनजी टाटा यांच्यावर प्रेम करणारे व त्यांची प्रेरणा घेणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुडाळ मध्ये आज रतनजी टाटांसाठी आदरांजली सभा
