मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड संपर्क अध्यक्ष श्री नितीन पवार यांच्या सौजन्याने आणि उपजिल्हाध्यक्ष श्री गणेश वाईरकर यांच्या मागणीनुसार हडी कोथेवाडी येथे भिसळे परिवार यांच्या गणेश मंदिरास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोलर लाइट प्रदान करण्यात आली.
हडी विभागाध्यक्ष श्री हरेश भिसळे आणि शाखाध्यक्ष श्री दिनेश तोंडवळकर यांनी श्री गणेश वाईरकर यांच्याकडे बरेच दिवस गणेश मंदिरासाठी एक सोलर लाईट ची मागणी केली होती. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या सोलर लाईट चे लोकार्पण करण्यात आले.यावेळी विभागाध्यक्ष हरेश भिसळे शाखाध्यक्ष दिनेश तोंडवळकर सागर जाधव योगेश भिसळे साहिल भिसळे शिवम तोंडवळकर राहुल भिसळे आदित्य शेडगे जगदीश शेडगे गौरव तोंडवळकर ओंकार शेडगे दिव्या भिसळे प्रशांत भिसळे प्रतीक्षा भिसळे वीरू भिसळे युविका भिसळे इतर सर्व महाराष्ट्र सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गणेश मंदिर हडी कोथेवाडी येथे सोलर लाइट दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्मा राजसाहेब ठाकरे यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

हडी येथे मनसेच्या वतीने गणेश मंदिराला सोलर लाईट प्रदान…!!
