Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
ruchira top

मालवणात 51 हजाराचा बेकायदेशीर गुटखा साठा जप्त

मालवणात 51 हजाराचा बेकायदेशीर गुटखा साठा जप्त

संशयित आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी


सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई


मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर साठ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५१ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान संशयित आरोपीस अटक करत न्यायालयात हजर केले असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ३ जून रोजी सायंकाळी ४.२५ वाजण्याच्या सुमारास मालवण शहरातील रांगोळी महाराज मठ नजीक असलेल्या महालक्ष्मी जनरल स्टोअर्सच्या बाजूच्या एका शेडमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आणि मानवी शरीरास घातक असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा सुमारे ५१ हजार २५ रुपयांचा मोठा साठा आढळून आला. हा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अमित अशोक सावंत (वय- ४० वर्षे, रा. भरड रांगोळी महाराज मठ जवळ, ता. मालवण) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून मानवी जीविताला धोका निर्माण करणारे पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोझा यांनी याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत करत आहेत.

rapan bottom